🌟आरक्षणाच्या लढ्यात यश ; मुंबई येथे गेलेल्या मराठा समाज बांधवांचे फरकंडा नगरीत जल्लोषात स्वागत....!


🌟फरकंडा येथे विजयी मिरवणूक ढोल,ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात संपन्न🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फरकंडा येथील मराठा समाज बांधव हे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षणमिळावे यासाठी काढलेल्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाले होते.


  मुंबई येथील संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्यात यश आले. आरक्षणाचे यश घेऊन परत आलेल्या सकल मराठा समाजाच्या नागरिकांची फरकंडा येथे विजयी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ढोल, ताशा, डीजे व फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत गावभर जल्लोष साजरा करण्यात आला.

  यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत पेढे भरवले महिला, परुष व तरुण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या