🌟दि.४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संत नामदेव साहित्य संमेलनात होणार वितरण🌟
(डॉ सदानंद मोरे,प्रा.फ.मु.शिंदे,निर्मलकुमार सूर्यवंशी,दत्ता डांगे,मनोज बोरगावकर,डॉ हंजराज वैद्य,व्यंकटेश चौधरी,शिवा कांबळे यांचा समावेश)
नांदेड (३१ जानेवारी) - येथील नानक साई फाऊंडेशनच्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डॉ सदानंद मोरे, प्रा.फ.मु.शिंदे,निर्मलकुमार सूर्यवंशी,दत्ता डांगे,मनोज बोरगावकर,डॉ हंजराज वैद्य,देविदास फुलारी,डॉ भगवंत क्षीरसागर , शिवा कांबळे,व्यंकटेश चौधरी यांचा पुरस्कारात समावेश आहे.
नानक साई फाऊंडेशनच्या वतीने तारीख ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर यांनी दिली. सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम आणि नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या पुढाकाराखाली हे संमेलन श्री गुरु ग्रंथ साहिब भवन (नांदेड) येथे आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ संदानंद मोरे (पुणे),प्रा.फ.मु.शिंदे (छत्रपती संभाजीनगर),डॉ हंसराज वैद्य नांदेड, देविदास फुलारी,शिवा कांबळे,मनोज बोरगावकर (नांदेड),डॉ संजय बालाघाटे (पालम),डॉ. माधव जाधव (बाळापूर),डॉ. वामन निबांजी साळवे (कोल्हापूर),दिलीप गणपत आसबे (संभाजीनगर),डॉ चंद्रकांत वाघमारे बेळगाव ( कर्नाटक), निर्मलकुमार सूर्यवंशी ,दत्ता डांगे, चंद्रकांत शहासने पुणे,डॉ. व्यंकटी पावडे,डॉ भगवंत क्षीरसागर (नांदेड),व्यंकटेश चौधरी,श्रीहरी वेदपाठक,धोंडीबा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड,स सो खंडाळकर,धोंडीबा गायकवाड,सुदर्शन रापतवार अंबाजोगाई,शिवाजी कऱ्हाळे हिंगोली,डॉ मचीन्दरनाथ नागरे यांना नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत असे घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर यांनी सांगितले......
0 टिप्पण्या