🌟परभणी येथील सुजाता बुद्ध विहार येथे दि.३० जानेवारी रोजी आंतररष्ट्रीय भिक्खू संघाची धम्म देशना....!


🌟यावेळी कोरिया येथील भिक्खू संघाची राहणार विशेष उपस्थिती🌟 

परभणी शहरातील सर्व बौद्ध उपासक उपसिका याना कळविण्यात येते की सुजाता नगर वासीयांच्या वतीने मंगळवार दि.३० जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता धम्म देशनेच्या कार्यक्रमाचे आयोजन सुजाता बुद्ध विहार सुजाता नगर येथे केले आहे.

या कार्यक्रमाला दक्षिण कोरिया येथील नामवंत भिक्खू आदरणीय भिक्खू हॉंग जीन सु व भिक्खू डॉ.ली ची रॅन व्हाईस,चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ, तसेच पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो दिल्ली संघनायक अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गया, पू.भदंत डॉ.उपगुप्तजी महाथेरो कार्यध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ,भन्ते मुदितानंद थेरो हे उपस्थित राहणार आहेत शहरातील सर्व बौद्ध उपासक उपसिका यांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धम्म देशनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुजाता बुद्ध विहार समिती तर्फे करण्यात आले आहे.......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या