🌟पूर्णा जंक्शन येथे इलेक्ट्रिक लोको शेड करा – तुषार गायकवाड



🌟साऊथ सेन्ट्रल रेल्वे प्रशासनाने द्वेष भावनेतून पूर्णा जंक्शनला वारंवार डावलेले असल्याचा आरोपही तुषार गायकवाड यांनी केला🌟

पूर्णा जंक्शन हे सन १९१२ पासुन निझाम रेल्वे सिस्टीमने मध्यस्थानी असल्यामुळे जंक्शन स्टेशन निवडले होते.व या ठिकाणी अगोदर मिटरगेज रेल्वे लाईनचे स्टीम लोको शेड कार्यान्वित होते. व या प्रकारचे स्टीम लोको शेड या अगोदर काझीपेठ,लालगुडा आणि विजयवाडा या ठिकाणी कार्यान्वित होते.व या स्टीम लोको शेडला साउथ सेन्ट्रल रेल्वेने डीजेल आणि इलेक्ट्रिेक लोको शेड मध्ये रुपांतरीत केले आहे परंतु पूर्णा जंक्शन येथील स्टीम लोको शेड बंद करण्यात आले व काझीपेठ,लालगुडा आणि विजयवाडा याप्रमाणे डीजेल आणि इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये रुपांतरीत केले नाही.आणि द्वेष भावनेतून पूर्णा जंक्शन ला साउथ सेन्ट्रल रेल्वेने वारंवार डावलेले आहे.


पूर्णा जंक्शन ची कन्नेक्टीविटी ही मनमाड,औरंगाबाद,परभणी,बसमत,हिंगोली,अकोला,परळी,लातूर,उस्मानाबाद,आदिलाबाद,नागपूर,निझामाबाद,तिरुपती, काचीगुडा ला आहे. व पूर्णा जंक्शन येथून काझीपेठ,लालगुडा आणि विजयवाडा येथील इलेक्ट्रिरक लोको शेड हे ४५० किलोमीटर अंतरावर आहे.म्हणून साउथ सेन्ट्रल रेल्वेला या कन्नेक्टीविटी करिता पूर्णा जंक्शन हे लोकोची देखभाल करण्याकरिता वेळ कमी लागणार आहे म्हणून येथे इलेक्ट्रि क लोको शेड करणे अत्यंत गरजेचे आहे.

साउथ सेन्ट्रल रेल्वेच्या प्रधान कार्यालयातील विद्युत विभागातील अधिकारी श्री. बी.श्रीनावासू सिकंदराबाद यांनी दि.२८/१२/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीने रेल्वे मंत्रालय दिल्ली यांना दिलेल्या निवेदनांवर उत्तर देतांना असे कळविले आहे की, साउथ सेन्ट्रल रेल्वेने इलेक्ट्रि क लोको शेड करिता प्रस्ताव सादर केलेला नाही असे कळविले आहे पूर्णा जंक्शन हे व्यस्थ रेल्वे स्टेशन असून येथे शेकडो एक्कर जमीन पडीत असून हि रेल्वेच्या मालकीची आहे.आणि या ठिकाणी सी.डब्लू वर्क शॉप,रेल्वे यार्ड,रेस्ट हाऊस-रनिंग रूम,रेल्वे क्वार्टर,इंग्लिश शाळा,हॉस्पिटल,कम्युनिटी हॉल इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

रेल्वे मंत्रालय दिल्ली येथे दि.०८/०१/२०२४ रोजी साउथ सेन्ट्रल रेल्वे कडून इलेक्ट्रि क लोको शेड चा प्रस्ताव पूर्णा जंक्शन करिता मागविण्यात यावा या करिता निवेदन वंचित बहुजन आघडीच्या वतीने देण्यात आले आहे हा प्रस्ताव जर साउथ सेन्ट्रल रेल्वेने पाठविला नाहीतर येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “रेल्वे रोको आंदोलन” करण्यात येणार असा इशारा परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी दिला आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या