🌟परभणीत चाचा नेहरु बालमहोत्सवाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन.....!


🌟यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी सामाले, अपर कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे यांची उपस्थिती🌟

परभणी (दि.29 जानेवारी) : परभणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत दि. 29 ते 31 जानेवारी दरम्यान होत असलेल्या बालमहोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी श्री. सामाले, अपर कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, लेखाधिकारी श्रीमती शिंदे, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. कातनेश्वरकर, बाल न्याय मंडळाचे सदस्य श्रीमती नेरलीकर, श्री. पुराणिक, शासकीय बालगृह अधीक्षक गोविंद अंधारे, अनिल कांदे, जिल्हा सरंक्षण अधिकारी श्री. नागरे, परिविक्षा अधिकारी श्रीमती तांदळे, श्रीमती मनतकर, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

हा बालमहोत्सव 29 ते 31 जानेवारी दरम्यान सुरू राहणार असून दि. 29  रोजी रनिंग, कबड्डी, दोरीवरच्या उड्या, लांब उडी, लिंबू चमचा या सारख्या 8 मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या असून या मध्ये प्रथम, द्वितीया व तृतीय असे क्रमांक काढण्यात आले आहेत. दि. 30 रोजी बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व, रांगोळी, यासारखे इनडोअर गेम तर दि. 31 रोजी गीतगायन, नृत्य हे संस्कृतीक कार्यक्रम व समारोप होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 500 विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या