🌟पुर्णा येथे दर्पण दिनी शहीद सरदार उधमसिंघ फाउंडेशनच्या व वतीने संपादक प्रसाद पौळ याचा सन्मान....!


🌟सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींचा आपण सन्मान करून मला एक नवी ऊर्जा प्रदान केली - प्रसाद पौळ 

दि, ०६ जानेवारी २०२४ रोजी रुरल एक्स्प्रेसचे  संपादक प्रसाद  पौळ याना शहीद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र वतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दर्पण दिन - 2024 हा पुरस्कार देण्यात आला पालम तालुक्यातील फरकंडा येथेल रविवासी ग्रामीण भागातील एका खेड्यातील ते जिल्हाभरात चालणाऱ्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शेतकरी शेतमजूर यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या कुठलीही अपेक्षा न करता सडेतोड पने पत्रकारिता करीत त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्व सामान्य जनते प्रश्न व शेतकऱ्यांच्या समस्या वारंवार वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासनापर्यंत पाठपुरावा करीत असल्यामुळे त्यांना आज सहा जानेवारी रोजी पूर्णा येथील नगरपरिषदेच्या पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सन्मान करण्यात आला यावेळी परभणी जिल्ह्याभरातील संपादक व पत्रकार बांधव विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

🌟सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींचा आपण सन्मान करून मला एक नवी ऊर्जा प्रदान केली - प्रसाद पौळ 

माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींचा आपण आपल्या शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने सन्मान करून आपण मला एक नवी ऊर्जा प्रदान केली आपल्या फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद करतो

संपादक प्रसाद पौळ रुरल एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या