🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे हरी किर्तन संपन्न....!


🌟हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावकऱ्यांनी दिले ७१ हजार रुपयें🌟


पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे काल बुधवार दि.०३ जानेवारी २०२४ रोजी अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे हरी किर्तन संपन्न झाले यावेळी गावातील मराठा जे बांधव दि.२० जानेवारीला २०२४ रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे जाणार आहेत त्यांना टेम्पो भाडे,जेवन,पाणी आदी सुविधांची सोय व्हावी म्हणून किर्तन केशरी गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले. 


किर्तन केशरी गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यावेळी फुकट गावातील गावकरी नागरिकांनी ७१ हजार रुपये यावेळी जमा करून दिले. प्रत्येकाने धर्मासाठी आपल्या लेकरासाठी लेकराच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण हे खूप महत्त्वाचे आहे यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावात अशीच वर्गणी गोळा करून सहकार्य केले पाहिजे असे आवाहन महाराजांनी उपस्थितांना केले जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या