🌟पुर्णेत प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी तहसीलसह पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा...!


🌟भव्य मोर्चात सहभागी आंदोलनकर्त्यांनी पुर्णा-ताडकळस महामार्ग एक तास रोखून धरला🌟

परभणी - प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा शाखेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग, निराधार परितक्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देत नसल्याने संताप्त झालेल्या आंदोलकांनी पूर्ण ताडकळस हा महामार्ग एक तास रोखून धरला त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर नायब तहसीलदार श्री प्रशांत थारकर यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.



पुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीचे वाटप केले जात नाही तो निधी तत्काळ वाटप करण्यात यावा ज्या ग्रामपंचायत ५% दिव्यांग कल्याण निधीचे वाटप करत नाहीत अशा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा प्रशासनाने दाखल दाखल करावे, घरकुल योजनेत गावातील दिव्यांग विधवा निराधार यांना प्राधान्य देण्यात यावे, ज्या दिव्यांगांचे आधार कार्ड अद्याप निघाले नाहीत त्या दिव्यांगाचे आधार कार्ड त्यांच्या घरी जाऊन काढण्यात यावेत, दिव्यांग, निराधार व वयोवृद्ध या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीय बँकेमध्ये वर्ग करण्यात यावेत, दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात तसेच रेशनची पावती न देणाऱ्या रेशन दुकानदारांचे लायसन तात्काळ निलंबित करण्यात यावे या व अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिव्यांगांचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने गट विकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के व शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले यावेळी अनेक दिव्यांगांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बाबन ढोणे, श्रीहरी इंगोले, मदन भोसले, सुरेश वाघमारे, राम सुक्रे, बळीराम गुंडाळे,आयुब शब्बीर शहा, सलीम सिकंदर शहा, सय्यद मुनीर आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या