🌟उद्घाटन सोहळा आज सोमवार दि.०१ जानेवारी रोजी हभप.शिवाजी महाराज बोकारे यांच्या शुभहस्ते संपन्न🌟
पुर्णा (दि.०१ जानेवारी) - पुर्णा शहरात अत्याधुनिक फोटोग्राफीच्या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दि.०१ जानेवारी रोजी हभप.शिवाजी महाराज बोकारे यांच्या शुभहस्ते तथा ज्येष्ठ फोटोग्राफर पुरुषोत्तम आर्य,ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श सेवानिवृत्त शिक्षक जगदीश जोगदंड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
पुर्णा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष केदार पाथरकर ह्यांनी पूर्णेकरांच्या सेवेत हा अत्यधूनिक फोटो ग्राफी व व्हिडिओ सह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी पूर्णेतील विविध मान्यवरांनी स्टुडिओ ला भेट देत शुभेछा दिल्या आहेत, पत्रकार पाथरकर यांचे चिरंजीव श्रीनिवास हा उत्तम फोटोग्राफर आहे त्याच्या माध्यमातून सदर स्टुडिओ उभारण्यात आला आहे....
0 टिप्पण्या