🌟अवैधरित्या कत्तल करण्या करीता डांबून ठेवलेल्या 61 गोवंशाची सुटका....!


🌟एक चारचाकी वाहन,चार मोबाईल असा एकूण किंमत 11 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम:- दिनांक 18/01/2024 रोजी गुप्त बातमी मिळाली की,स्वासीन रोडकडील एका शेतात टिनाचे शेड मध्ये काही गोवंश कत्तली करीत अवैधरीत्या बांधून ठेवलेली आहेत. अशा गोपनिय माहीतीवरुन पोलीस स्टाफसह छापा टाकला असता आरोपीतांनी स्वासीन रोडवरील शेतातील टीनाचे शेडमध्ये एकूण 61 लहान मोठे गोवंश याना आखूड दोरीने पायाला बांधून गैर वाजवी काळा करीता बांधून ठेवले तसेच गोवंश ला अन्न पाण्याची व्यवस्था न करता वेदना करून छळ केल्याने त्यांची क्रुरतेने निर्दयीपणे कत्तल करण्याकरीता विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असतांना 61 गोवंशाची सुटका करुन सहा आरोपी यांचेकडून चार मोबाईल आणि एक चारचाकी वाहण असा एकूण 11,50,000/रुच्या मुद्देमाल जप्त करुन त्यांना गोवंश ताब्यात घेवून सदर आरोपीतांविरुध्द पोस्टे ला अप क्र 25/2024 कलम 379,429 भा द वी सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधि. 1976 क.5 (अ) (2), 5(ब) सह प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्या बाबत 1960 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील सहा आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड करीत आहे.

सदरची कार्यवाही अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम,भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम,निलीमा आरज उपविभागिय पोलीस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आडे,सपोनि/ शिवचरण डोंगरे, सपोनि निलेश शेंबळे, सपोनि/ अल्का गायकवाड, पोउपनि दिनकर राठोड, सफौ/556 रामेश्वर रामचवरे, पोहेकॉ/04 चरण चव्हाण, पोहेकॉ/867 अमोल मुंबे, पोना/283 सुनिल गंडाईत, पोकॉ/1374

मोहमंद परसुवाले, पोकॉ/154 दिनेश चिस्ताळकर, पोकॉ/389 अमोल वानखडे, पोकॉ/1441 अनिल हमाने,

पोकॉ/316 सुमित चव्हाण, चापोना/999 उमेश ठाकरे, पोकॉ/गिरीश बोळे, मोकॉ/1327 बबन अंभोरे यांनी केली.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या