🌟नांदेड येथील 50 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट.....!


🌟अमृतसर,नासिक,पंजाब पोलीस आणि मुंबई उपांत्य फेरीत दाखल🌟

🌟उद्या पंजाब पोलीस विरुद्ध आर्टलेरी नासिक आणि एसजीपीसी अमृतसर विरुद्ध एमपीटी मुंबई खेलणार🌟

✍🏻रविंद्रसिंघ मोदी - नांदेड 


नांदेड (दि.15 जानेवारी) : येथे सुरु असलेल्या 50 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या उपांत्य फेरी साठी एसजीपीसी अमृतसर, आर्टलेरी सेंटर नासिक, पंजाब पोलीस आणि एमपीटी मुंबई संघ पात्र ठरले आहेत. मंगळवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत अशी माहिती आयोजन समेतीचे अध्यक्ष सरदार गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली.

सोमवार,15 जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीचे चार सामने खेळले गेले. पहिला सामना एसजीपीसी अमृतसर आणि सेंट्रल रेलवे पुणे डिवीजन या संघात खेळला गेला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य प्रदर्शित केले. तिसऱ्या सत्रात 42 मिनिटाला अमृतसर संघाच्या जुगराजसिंघ याने पहिला गोल केला. नंतर हर्षदीपसिंघ याने अमृतसर संघासाठी 47 आणि 51 मिनिटाला गोल करून सामना निर्णायक आवस्थेत पोहचवला. पुणे संघ एकही गोल करू शकला नाही.दूसरा सामना आर्टलेरी सेंटर नासिक आणि हावडा डिवीजन कोलकाता संघादरम्यान खेळला गेला. संघर्षपूर्ण सामन्यात आर्टलेरी सेंटर नासिक विजयी ठरला. तर बलाढ्य असा कोलकाता संघ दुर्दैवी ठरला म्हणावा लागेल. नासिक तर्फे एकमात्र गोल खेळाच्या सुरुवातीला तिसऱ्या मिनिटाला नरेंद्र चामल यांनी पेनाल्टी कॉर्नर मध्ये केला.

आजचा तीसरा क्वार्टर फायनल सामना दुपारी पंजाब पोलीस आणि साईं एक्सेलेंसी औरंगाबाद संघात खेळविला गेला. दोन्ही संघांनी उच्च पातळीच्या खेळाचे प्रदर्शन केले. शेवटी सामन्याचा निर्णय पंजाब पोलिस संघाच्या बाजूने गेले. पण औरंगाबादच्या संघाने प्रेक्षकांची सहानुभूति मिळवली. खेळाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटलाच औरंगाबाद संघाने भारत यानी केलेल्या मैदानी गोलाने आघाडी मिळवली. पुन्हा खेळाच्या 15 व्या मिनिटाला औरंगाबादच्या अनुरुद्ध ने मैदानी गोल करत प्रेक्षकांची मनें जिंकली. पण सोळाव्या मिनिटाला पंजाब पोलीस संघाने पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करून सुस्ती झटकली. हा गोल करणबीरसिंघ याने केला. त्यानंतर पंजाबच्या वरिंदरसिंघ याने 21 आणि 31 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टी स्ट्रोकचे गोलात रूपांतर केले आणि आघाडी घेतली. पण औरंगाबादच्या मोहितने 34 व्या मिनिटाला सुरेख असा मैदानी गोल केला आणि सामना बरोबरीवर पोहचवला. पंजाब संघाच्या कारणबीर सिंघने साजेशा खेळ दाखवत 47 व्या मिनिटाला मैदानी गोल करत पुन्हा आघाडी मिळवली. औरंगाबाद संघाला नंतर आघाडी ओलंडण्यात अपयश आले. पंजाब पोलीस संघाने शेवटी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

आजचा चौथा उपांत्यपूर्व सामना एमपीटी मुंबई आणि कस्टम मुंबई संघादरम्यान झाला. हा सामना टायब्रेकर मध्ये जिंकत एमपीटी मुंबई संघाने उपांत्य फेरी गाठली. सुरुवाती पासून उत्कृष्ट असा खेळ खेळणाऱ्या कस्टम मुंबई संघास शेवटी अपयश लाभले. उद्या उपांत्य फेरीत पंजाब पोलीस आणि आर्टलेरी सेंटर नाशिक मध्ये दुपारी 2 वाजता पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. तर शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर आणि एमपीटी मुंबई संघात दुपारी 3.30 वाजता दूसरा सामना खेळला जाईल......

- रवींद्रसिंघ मोदी - नांदेड 

........... 

फोटो : मुनावर खान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या