🌟नांदेड येथील 50 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप...!


🌟कोलकाता,नासिक आणि औरंगाबादची विजयी सलामी🌟

✍🏻रवींद्रसिंघ मोदी 

नांदेड दि.10 जानेवारी : येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर बुधवारी सुरु झालेल्या 50 व्या ऑल इंडिया श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोलकाता, नासिक आणि औरंगाबाद संघानी विजयी सलामी देत आपापले सामने जिंकले. तर नागपुर आणि पुणे संघा दरम्यान सामना अनिर्णीत राहिला.


आजचा पहिला सामना ऑरेंज सिटी नागपुर आणि सेंट्रल रेलवे पुणे डिवीजन संघा दरम्यान खेळला गेला. दोन्ही संघानी परस्पराविरुद्ध एक - एक गोल करत सामना अनिर्णीत राखला. नागपुर संघाच्या नियाज रहीम याने  खेळाच्या 23 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल करत आघाडी मिळवली होती. संघर्षपूर्ण सामन्यात पुणे संघाने 47 व्या मिनिट मैदानी गोल करत बरोबरी साधली. कर्णधार विनीत कांबळे याने हा गोल केला.

दूसरा सामना साईं एक्सेलेंसी औरंगाबाद आणि दिल्ली यूनिवर्सिटी संघादरम्यान खेळला गेला. औरंगाबाद संघाने हा सामना 6 विरुद्ध 1 गोल फरकाने जिंकला. औरंगाबाद संघाने पाच मैदानी गोल केले तर एक गोल पेनल्टी स्ट्रोक मध्ये झाला. गिरीश ने 2 गोल केले तर भारत, अभिषेक, हर्षदीप आणि बाबू ने प्रत्येकी एक गोल केला. दिल्लीच्या सुमितने पेनल्टी कॉर्नर मध्ये एक गोल साधला.

तीसरा सामना आर्टिलेरी सेंटर नासिक संघाने इलेवन स्टार अमरावती संघाचा 3 विरुद्ध 0 फरकाने सहज जिंकला. नासिक संघाने तीन्ही गोल पेनल्टी कॉर्नर मध्ये केले. मनप्रीत चीमा याने 2 तर नरेन्द्र चामल याने एक गोल नोंदवला.

आजचा चौथा सामना हावडा डिवीजन कोलकाता आणि सुफीआना हॉकी क्लब अमरावती दरम्यान खेळला गेला. कोलकाता संघाने 5 विरुद्ध 1 असा सामना जिंकला. कोलकाता तर्फे तरुण अधिकारी याने दोन गोल केले. तर संतोष बकसला, अलसेम लाकरा, सौरभसिंघ याने एक एक गोल नोंदवला. अमरावती तर्फे शेवटच्या मिनिटात अलीम मोहम्मद याने गोल केला....

......

फोटो :  मुनावर खान ने ईमेल वर पाठविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या