🌟परभणी येथे आयोजित रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी केले रक्तदान....!


🌟राधाजी शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन🌟 

परभणी : बहुजनांचे झुंजार नेते राधाजी शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्यावतीने  शुक्रवार 26 जानेवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

        येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराप्रसंगी सत्कारमूर्ती राधाजी शेळके, डॉ.केदार खटिंग, सौ. जिजाबाई शेळके, भाजपा नेते सुरेश भुमरे, युवानेते आशिष भैय्या वाकोडे, हमाल युनियनचे नेते रोहिदास नेटके, शेषराव सावळे, मराठवाडा सरचिटणीस बन्सीलाल भंडारी, युवा नेते शिवाजी शेळके, प्रा. अंकुश कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष एम.डी.वाव्हळे, गणेश घोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी समाज बांधवांना देशपिता लहुजी साळवे यांच्या प्रतिमाचे वाटप करण्यात आले. तसेच  पिंगळी येथील लाहुसैनिक दिगंबर आगलावे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ गायकवाड, युवानेते विजय शेळके, कन्हैय्या साळवे, दिलीप सावळे, राजु कांबळे, हनुमान भालेराव, बालाजी नवसे, दिलीप सावळे, गोविंद कांबळे, मिलिंद दुधाने, सुमेध भराडे, आकाश अंभोरे, विनोद वाव्हळे, विशाल वाव्हळे, अविनाश अंभोरे, राजु सोनवणे, गणेश बोराडे, सूरज रणखांब आदींनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या