🌟विदर्भ ते मराठवाड्यास जोडणारा 406 किलो मीटर अंतराचा वर्धा ते नांदेड रेल्वे मार्ग लवकरच खूला होणार ?


🌟वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे लोकार्पण या दौर्‍यात मोदी यांच्या हस्ते व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरु🌟

परभणी (दि.२९ जानेवारी) :  विदर्भ ते मराठवाड्यास जोडणार्‍या 406 किलो मीटर अंतराच्या वर्धा-यवतमाळ ते नांदेड हा रेल्वे मार्ग लवकरच वाहतूकीस खुला होईल अशी चिन्हे आहेत.

          वर्धा येथून यवतमाळ मार्गे नांदेडला जाण्यासाठी 10 तास लागत आहेत. परंतु, हे अंतर कमी व्हावे, विशेषतः विदर्भ व मराठवाडा एकमेकास जोडला जावा व विकासाचे नवे पर्व सुरु व्हावे, या दृष्टीने वर्धा ते यवतमाळ मार्गे नांदेड या रेल्वे मार्गाकरीता आग्रह सुरु होता. 2009 या साली या रेल्वे मार्गास मंजूरी सूध्दा बहाल झाली. परंतु 2016 मध्ये रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात झाली. एकूण 206 किलो मीटर अंतराच्या व अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चाच्या या रेल्वेमार्गाचे वर्धा ते यवतमाळ 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गावरील 15 मोठे पूल, 29 बोगदे व 5 उड्डाणपुलाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. वर्धा ते कळंब या 40 किलो मीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून देवळी रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळेच हा रेल्वे मार्ग वाहतूकीसाठी लवकरात लवकर खूला होईल, अशी चिन्हे आहेत.  विदर्भ व मराठवाड्यास जोडणार्‍या या रेल्वे मार्गामुळे नांदेड ते वर्धा हे अंतर केवळ 4 तासात या रेल्वे मार्गाद्वारे पार करणे शक्य होणार आहेत.

        दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात विदर्भाच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते यवतमाळ येथील महिलांच्या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. बहुप्रतिक्षित, बहुचर्चित वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे लोकार्पण या दौर्‍यात मोदी यांच्याहस्ते व्हावे, या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या