🌟परभणी येथील प्रमोद अशोकराव अंभोरे यांना 'स्वामी विवेकानंद युवासेवारत्न पुरस्कार 2024' जाहीर...!


🌟त्यांना स्वामी विवेकानंद युवासेवारत्न पुरस्कार दि.१२ जानेवारी रोजी करण्यात येणार प्रदान🌟 

परभणी(दि.१० जानेवारी) - परभणी शहरातील समाज हितासाठी, रुग्णहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव तथा लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव  तथा  डिजिटल मीडिया परिषद परभणी प्रमुख तथा मराठी पत्रकार संघ परभणी महानगर सहसचिव  तथा  समाजहित न्यूज चे संस्थापक संपादक  प्रमोद अशोकराव  अंभोरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, रुग्णहितार्थ, निर्भीड पत्रकारिता, सांस्कृतिक निःस्वार्थ कार्याचा आढावा घेऊन प्रमोद अंभोरे यांना रामकृष्ण हरी मित्र मंडळ संचलित विर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा "प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2024" या पुरस्कार अंतर्गत "स्वामी विवेकानंद युवासेवारत्न पुरस्कार 2024" हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी भगवा चौक महारुद्र हनुमान मंदिर ओपन जिम मैदान रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी येथे  वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पार पडणार आहे. 

     या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन विर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी चे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी ह.भ.प. गोविंद पोंढे गुरुजी, स्वागतध्यक्ष चंद्रकांत डहाळे, उदघाटक कमलकिशोर अग्रवाल, प्रमुख अतिथी ऍड. पवन निकम, निमंत्रक संजीव अढागळे, प्रमुख पाहुणे शिवलिंग आप्पा खापरे, सल्लागार नारायण चद्रे हे असणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यात  विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या  14 मान्यवरांचा  पुरस्कार देऊन सन्मानित करून  गौरव करण्यात येणार आहे. प्रमोद अशोकराव अंभोरे  यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या