🌟शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 साठी अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟पुरस्कारासाठी दि.08 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन🌟 

परभणी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in  संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 8 ते 22 जानेवारी, 2024  या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या