🌟नांदेड येथील शिख समाज असमजस परिस्थिती मध्ये.......!

    


🌟नांदेड येथील पवित्र सचखंड गुरूद्वाराचे प्रबंधन करण्याची बाहेरील लोकांना का म्हणून संधी द्यावी ?🌟                         

सध्या महाराष्ट्र सरकार भाटिया समितीच्या अहवालानुसार नुसार संचखड गुरूद्वऱ्याच्या जुन्या 1956 च्या कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा आणण्याची तयारी करत आहे. याला मा माजी मुख्यमंत्री अशोकराव जी चव्हाण साहेबांनी ही सहमती दर्शविली आहे. फक्त मा आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सत्य वस्तुस्थिती बाबतीत विधानसभा मध्ये लक्षवेधी सूचना देताना स्थानिक शिख समाजाच्या भावना स्पष्ट शब्दात मांडण्याची भूमिका पत्करली आहे.

भाटिया समितीच्या अहवालानुसार नुसार पंजप्यारें साहीबान व सदस्यांशी चर्चा झाल्याचा उल्लेख केला आहे व त्या आधारे ह्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला गेला आहे परंतु भाटिया समितीच्या अहवाल हा सरासर चुकीच्या पद्धतीने सादर केलेला आहे असे सध्या तरी जुन्या कागदोपत्रा वरून वाटते. कारण भाटिया समितीच्या अहवालानुसार दिनांक 03 जुलै 2014 ला गुरूद्वऱ्याच्या जत्थेदार व चार प्यारे सोबत व सदस्या सोबत चर्चा झाल्याचा दावा केला गेला आहे परंतु दिनांक 27-4-2014 पंजप्यारें साहीबान व त्या वेळच्या समीती सोबत चर्चा झाल्या नंतर पंजप्यारें साहीबान व समीती सदस्यांनी जुना 1956 चा कायदा योग्य असल्याचा निवाडा दिला व या मध्ये सरकार ने काही ही बदल करू नये असे स्पष्ट शब्दात सरकारला पत्राद्वारे कळविले असल्याचे पुरावी कागदपत्रे उपलब्ध आहेत. मग विनाकारण सरकार तर्फे कायदा बदलण्यासाठी एवढी खटाटोप कशासाठी साठी हेच समजत नाही. जर न्याय व्यवस्थेत संपूर्ण आयुष्यभर चांगली सेवा देणाऱ्या रिटायर्ड न्याय मुर्तीच जर अशी खोटी अहवाल सादर करत असल्यास जनतेने मग विश्र्वास कोणावर ठेवावा हा एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.  दुसरी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. ज्या भाटियाजीनीं आयुष्य भर सत्याच्या पालन करण्याची भूमिका पत्करली होती ते असे करू शकतील या वर विश्र्वास बसण्यासारखी गोष्ट नाही तर मग त्यांच्या मरणोपरांत कुणी तरी या मध्ये बदल करून भाटिया समीती चे नाव तर घेत नाही ना या बाबतीत विचार करणे आवश्यक आहे.

दुसऱ्या एका प्रमुख गोष्टी बाबतीत विचार करने जरूरीचे आहे की संपूर्ण जगभरात जे जे गुरूद्वारे अस्तित्वात आहेत त्या गुरूद्वऱ्याच्या प्रबंध तेथील स्थानिक लोकांना चलविण्या अधिकार आहे मग नांदेडच्याच गुरूद्वऱ्याच्या प्रबंध चालविण्यासाठी बाहेरील लोकांना का म्हणून संधी द्यावी.......‌‌.आज पर्यंत चा इतिहास पाहिला तर जास्तीत जास्त गुरूद्वऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जे पाऊल उचलले गेलेले आहेत ते येथील स्थानिक शिख समाजाच्या व्यक्तिंना त्याचे श्रेय जाते. ‌ एक छोटीशी बाब ही विचारात घेतली तर गुरतागद्दी ची संकल्पना स्थानिक शिख नेत्यांनी केली होती.....परंतु ऐनवेळी त्या पासून स्थानिक शिख नेत्यांना दुर करून बाहेर च्या लोकांच्या हाती सर्व काही सोपविण्यात आहे....ही एक फार दुर्दैवी व स्थानिक शिख लोकांवर एक प्रकारे अन्यायकारक भूमिका पत्करण्याची भूमिका म्हणावे लागेल........सध्या स्थानिक शिख समाजा मध्ये खुप असंतोष पसरलेला आहे. व स्थानिक शिख समाजाच्या कडून पंजप्यारें साहीबान ला ऐक निवेदन देऊन कलम 11 मधील संशोधन रद्द करून बोर्ड मेंबर कडून लोकशाही मार्गाने अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार परत करण्यासाठी व बोर्डाच्या 1956 च्या कायद्यात कोणताही फेरबदल न करता जुनाच कायदा अस्तित्वात ठेवण्यासाठी सरकारला पत्र देण्याची विनंती केली जात आहे...या उपर ही सरकार जर कायद्यात बदल करण्याचा बेत आखत असेल आणि जुन्या कायदा नुसार लोकशाही मार्गाने गुरूद्वऱ्याच्या बोर्डाच्या निवडणूका घेण्यासाठी टाळाटाळ केली तर लोकशाही मार्गाने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा शिख समाज मानस धरून आहेत. सरकार ला नम्र विनंती लवकरात लवकरात कलम 11 चे संशोधन रद्द करून बोर्डाच्या निवडणूका घेतल्या जावे हीच नम्र विनंती.   

तसेच मा अशोकराव चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केले असेल ते त्यांच्या पर्यंत खरी माहिती व स्थानिक समाजाचा याला विरोध आहे ही खरी माहिती पोहचली नसेल असे ही होऊ शकते.‌........सोबत सोबत नांदेडच्या सर्व राजकीय आमदारांना व नेत्यांना  विनंती आपण आपल्या मतदारसंघातील विषय नाही म्हणून डोळेझाक करू नये आणि नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून स्थानिक गुरूद्वारा बोर्ड बनविण्या पुरते आपसातील मतभेद विसरून वरील सर्व बाबींचा विचार करून तुमच्याच स्थानिक कार्यकर्त्यांना चांगले सामाजिक काम करण्यासाठी मार्ग मोकळा करून द्वावा ही विनंती कारण नांदेड चा गुरूद्वारा हा ऐतिहासिक व जगप्रसिद्ध आहे*. *या ठिकाणी विषेश विनंती सध्या नांदेडच्या खासदारखी भुषविणारे मा खा प्रताप पाटील चिखलीकर साहेब व मा खा हेमंत भाऊ पाटील साहेबांना कळकळीची विनंती आपण दोघांचेही शिख समाजाच्या लोकां सोबत खुप मैत्री पूर्ण सलोख्याचे संबंध असल्याने आपण ही या कामी आपल्या ताकदीचा उपयोग करून आपल्या स्थानिक शिख समाजाला योग्य न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती*.  *मी राजकारणापासून अलिप्त राहणारा एक सामान्य नागरिक असल्याने ....मी सर्व नेत्यांचा  मना पासून आदर सन्मान करतो व सगळ्यांना आपले समजुन हक्काने समाजा करता योग्य त्या मागणी साठी आवाज उठवितो लिखाणात काही चुक झाल्यास क्षमस्व..... 

सरदार राजेंद्रसिंघ नौनिहाल सिंघ शाहू

 इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर 

सेक्टर नंबर 1 हजुर साहब नांदेड 

मो.7700063999

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या