🌟समाजातील आदर्श व्यक्तींना पुढे ठेवून वाटचाल करावी - निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे


🌟आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा🌟 


फुलचंद भगत

वाशिम :- कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मार्ग हा शिक्षणातून जातो.अल्पसंख्यांक समाजात देखील अनेक आदर्श व्यक्ती होऊन गेलेत. या व्यक्तींचा आदर्श पुढे ठेवून समाजाने वाटचाल करावी.असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आज 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री.घुगे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख अतिथी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एड. महेश महामुने यांची उपस्थिती होती श्री.घुगे पुढे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजात येणाऱ्या मुस्लिम समाजामध्ये मागासलेपणाचे प्रमाण जास्त आहे.या समाजाने मुला मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. विशेषता मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे त्यामुळे समाजाशी प्रगती होऊन समाजाचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल.

        श्री.शहा म्हणाले,संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे.त्याचा लाभ आपण कसा घेतो यावर त्याचे यश अवलंबून आहे.योजना ह्या चांगल्या असतात.पण त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे.समाजाला आज मार्गदर्शकाची गरज आहे.कारण मार्गदर्शक हा  समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो.अल्पसंख्यांक समाजातील विशेषता मुस्लिम समाजातील युवा वर्गाने उद्योग व्यवसायाकडे वळावे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही.घरातील वातावरण शिक्षणाच्या दृष्टीने पोषक बनविले पाहिजे.माणूस बदलला की कुटुंब बदलेल,कुटुंब बदलले की समाज आणि समाज बदलला की देश बदलेल.एकत्रित होऊन विकासासाठी सर्वांनी पुढे यावे.असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

               श्री खडसे म्हणाले,भारतात विविध जाती,धर्म व पंथांचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटना ही जगातील एक आदर्श राज्यघटना आहे.राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार व संधी दिली आहे.देशात अल्पसंख्यांक समुदाय आहेत. यातील काही अल्पसंख्यांक समाज हे मागास आहेत.त्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहे.राज्यातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ कार्यरत आहे.अल्पसंख्यांक समाजाचे काही संविधानिक हक्क आहेत. अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन समाज बांधवांनी आपली प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

        ऍड.महामुने म्हणाले,18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस आहे.अल्पसंख्याकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रसंघाने अल्पसंख्यांकाचा जाहीरनामा स्वीकृत केला आहे. देशातील विविध भागात अल्पसंख्यांक राहतात.काही अल्पसंख्यांक हे मागास आहे.त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना आहेत.भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण कलम 26 ते 30 यामध्ये दिले आहे.अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाचा अधिकार आहे.भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांना सात मूलभूत अधिकार दिले आहे.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.

               यावेळी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी.एस खंदारे, डॉ. शेख तस्लिम,निलेश सोमानी,रमेश बस,प्रा.मोहम्मद सलमान शेख,जुनेद शेख यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला पत्रकार शिखरचंद बागरेचा,सुनील कांबळे,प्रमोद खडसे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिलीप मोहापात्रा,जिल्हा विशेष लेखा परिक्षक युसूफ शेख, यांचेसह अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ मोहीन खान,शिक्षण विस्तार अधिकारी बबन सुर्वे यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार अव्वल कारकून गजानन उगले यांनी मानले.संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.यावेळी उपस्थितांना जिल्हा माहिती कार्यालयाने अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध योजनांवर आधारीत " विकासाची दिशा " या पॉकेट बुक पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला विविध विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या