🌟परभणीत लोकसभा व राज्यसभेतील १४६ खासदारांच्या निलंबनाचा करण्यात आला तिव्र निषेध....!


🌟काँग्रेस पक्षाचे जेष्ठ मा.राज्यमंत्री आ.सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन🌟 

परभणी : लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १४६ खासदारांच्या करण्यात आलेल्या निलंबनाचा इंडियन अलायन्सेस अंतर्गत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी नेतेमंडळींनी काल शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी तिव्र आंदोलन करीत जोरदार  निषेध केला.

 परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर,काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अ‍ॅड.तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे,कॉ.राजन क्षीरसागर,सुरेश नागरे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश काळे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे,बाळासाहेब देशमुख,हरिभाऊ शेळके,मा.तालुकाध्यक्ष हनुमंत डाके,शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विशाल कदम,पंढरीनाथ घुले, प्रसाद गोरे,  रामभाऊ घाटगे, धोंडीराम चव्हाण, सय्यद अझहर, अमोल जाधव,  अजय चव्हाण, निळकंठ जोगदंड, अंगद सोगे आदींनी गुरुवारी इंडियन अलायन्सच्या घटक पक्षांनी आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात सहभाग नोंदवला.

              दरम्यान, सत्ताधारी पक्षाचा तो निर्णय म्हणजे हुकुमशाहीच होय, अशी टिका टिप्पणी विरोधी पक्षाच्या या नेतेमंडळींनी यावेळी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या