🌟पुर्णा शहरात मंगल अक्षदा भव्य कलश मिरवणूक संपन्न....!

   


🌟श्रीराम मंदिराच्या मुर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या भव्य कलश मिरवणूकीत अबालवृद्ध महिलांसह युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग🌟


 
पुर्णा (दि.२८ डिसेंबर)  :- पुर्णा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील श्री राम मंदिराच्या मुर्ती प्रतिष्ठान सोहळ्याची मंगल अक्षदा भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली.



 पुर्णा शहरातील श्रीराम मंदिर जन्म आयोध्या येथून आलेल्या अक्षदा व मंगल कलश भव्य मिरवणूक शहरातील  शहरातील अंबिका माता मंदिर येथून आनंद नगर चौक एसबीआय कॉर्नर बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सोनार गल्ली एकता गणेश मंडळ हे महादेव मंदिर अंबाबाई पाठी चौक व गुरु बुद्धी स्वामी मठ दत्त मंदिर गवळी गल्ली ते श्रीराम मंदिर या मार्गाने ही अक्षदा कलश भव्य मिरवणूक काढण्यात  या मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी सडा टाकून रांगोळ्या टाकल्या व कलश मिरवणुकीचे स्वागत केले.


या कलश मिरवणुकीत प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे सह फुलांनी सजवलेल्या वाहनावर कलश ठेवण्यात आला होता त्यावेळी श्रीरामाचा गजर करीत विविध पुजा आरती नंतर कलश मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूक भगवे झेंडे मोठ्या उत्साहाने राम नामाचा जयघोष करीत निघाले कलश मिरवणुकीत महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने मिरवणूक सहभागी झाल्या होत्या श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई सह पवनसूत्र हनुमान याचा देखावा सुद्धा करण्यात आला तसेच टाळ आणि मृदंगाच्या तालावर वारकरी संप्रदायातील छोटे वारकऱ्यांनी ही लक्ष वेधले होते या कलश यात्रेत प्रभू श्री राम नामाच्या जयघोषाने शहर दुमदुमून  गेले  अक्षदा कलश भव्य मिरवणुकीचे आयोजन सकल हिंदू समाज बांधवांकडुन करण्यात आले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या