🌟परभणी जिल्हा अजिंक्यपद क्राॅसकंट्री स्पर्धेचे पुर्णेत आयोजन.....!


🌟पुर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अँड प्रिंट,आनंद नगर कॉर्नर पुर्णा या ठिकाणी नावनोंदणी करावी🌟


परभणी/पुर्णा (दि.०५ डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथे रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी मुला/मुलींसाठी परभणी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ज्या खेळाडूंची बुलढाणा येथे होणाऱ्या  राज्य अजिंक्यपद  स्पर्धेसाठी निवड होईल , त्यांना 16 व 18 वर्षासाठी 200 रुपये तर वीस वर्षे व खुल्या गटासाठी 500 रुपये प्रवेश शुल्क त्वरित जमा करावी लागेल एएफआय ची युडीआय काढणे निवड झालेल्या स्पर्धेकांना बंधनकारक ( यापुर्वी ज्यांनी युडीआय काढलेले आहेत त्यांना पुन्हा काढण्याची आवश्यकता नाही.

या साठी कलर फोटो आधार कार्ड वयाचे सक्षम दाखले राज्य संघटनेच्या परिपत्रकात नमूद केल्या प्रमाणे  सोबत आणावे. ( झेरॉक्स प्रतीसह.) स्पर्धा दिनांक 10/12/2023 रविवार रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल. या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील खेळाडूच सहभागी होऊ शकतील  जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडेमी पूर्णा व परभणी जिल्हा अथलेटिक असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.हीं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्णेतील क्रीडा शिक्षक श्री. वसंत कऱ्हाळे, प्रा. सतीश बरकून्टे, श्री.सज्जन जस्वाल,श्री. धरमसिंग बायस, श्री.अंबादास काळे,श्री. प्रकाश रवणदळे, प्रा.डॉ.भारत चापके,प्रा. अब्दुल अन्सार, प्रा. डॉ. राहुल कांबळे, श्री. शंभु गायकवाड,श्री.शिवप्रसाद देवणे, सुमित छडीदार, कुंदन ठाकूर,आदी परिश्रम घेत आहेत. खालील जन्म तारखे प्रमाणे स्पर्धकांनी त्या त्या गटात सहभागी व्हावे लागेल.16 वर्षे मुले /मुली दिनांक 15/1/2008 ते 14/1/2010 

18 वर्षमुले /मुली दिनांक 15/1/2006ते 14/1/2008

20 वर्षे मुले /मुली दिनांक 15/1/2004 ते 14/1/2006, वीस वर्षा वरील खुला गट वयाची अट नाही.

खुला गट मुले/मुली 10 km...

20 वर्ष मुले 8 km,मुली 6 km, 18 वर्ष मुले 6km, मुली 4 km

16 वर्ष मुले 2 km ,मुली 2km

जिल्हास्पर्धेत दिनांक 5 डिसेंबर2023  सायंकाळी 5  वाजेपर्यंत 100 रुपये प्रवेश शुल्क भरून प्रा.डॉ महेश जाधव 

मो.नं 9960737160,  प्रा.ज्ञानेश्वर बोकारे,

मो.नं 9637479988, श्री. विलास चव्हाण मो.8007542219

यांच्याकडे नावनोंदणी करावी.

  पुर्णा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अँड प्रिंट ,आनंद नगर काँर्णर पुर्णा या ठिकाणी नावनोंदणी करावी...अधिक माहितीसाठी परभणी जिल्हा अथलॅटिक  संघटनेचे कैलास  टेहरे ( मो.9860914540) , यमनाजी भाळशंकर ( मो.9730384743) यांच्याशी संपर्क  करावा. जिल्हा संघटनेच्यावतीने अमोल नंद,  गंगाधर  आव्हाड,  निलेश कांळखे, प्रा. कल्याण  पोले, प्रा. अब्दुल अन्सार व प्रा. डाॅ. राहुल कांबळे यांनी गुरुवारी पुर्णा येथे जावुन ,धावनमार्गाची पाहाणी केली. असून परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा. डॉ. माधव शेजूळ, श्री. रणजित काकडे यांनी केले आहे.स्पर्धेचे ठिकाण. इस्सार एकलारे पेट्रोल पम्प बस्टॅन्ड रोड पुर्णा आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या