🌟परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन......!


🌟योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांच्या नाव नोंदणीसाठी 3 डिसेंबरपासून पोर्टल सुरू🌟 

परभणी (दि. 27 डिसेंबर) : महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. 

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देण्यासोबत दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.

योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांच्या नाव नोंदणीसाठी 3 डिसेंबरपासून पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्यासाठी 4 जानेवारी 2024 रोजीच्या 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या