🌟राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जेष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना जाहीर....!


🌟नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात जेष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार🌟

परभणी/पुर्णा (दि.२० डिसेंबर) - ऑल जर्नालिस्ट ॲन्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे. पूर्णेतील दै.लोकमत या वर्तमान पत्रात त्यांनी पंचवीस वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता केली,पत्रकार क्षेत्रात आदर्श कामगिरी बद्दल विजय हरिभाऊ बगाटे पूर्णा,यांना २४ डिसेंबर रविवार रोजी नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृह, पिपल्स कॉलेज नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

             पत्रकार विजय बगाटे हे अपंगाच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. ३५ वर्षापेक्षा जास्त काळापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत दै.लोकपत्र या वृत्तपत्रात उपसंपादक,दै.एकजूटचे वार्ताहर तसेच दै.लोकमतचे २५ वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते दै.देवगिरी वृत्त, दै. शिल्पकार, दै. रिपब्लिकन गार्ड या वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

        यापूर्वी प्राचार्य केशव जोंधळे संचलित संस्कृती सेवाभावी संस्था, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे संचलित तथागत सेवाभावी संस्था यांच्यातर्फे गौरव करण्यात आला आहे, याशिवाय परभणी येथे राजश्री शाहू महाराज पुरस्कार मिळाला आहे, पूर्णेच्या रेल्वे संघर्ष समितीत सह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे.२०२३ राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य मोहन मोरे,प्रकाश कांबळे,पत्रकार जगदीश जोगदंड, सतीश टाकळकर,दिनेश चौधरी,संजय गव्हाणे, गजानन हिवरे,दौलत भोसले, केदार पाथरकर,अतुल शहाणे,संपत तेली,सुशील गायकवाड,मोहन लोखंडे सुशील दळवी,अमृत कराळे मुजीब कुरेशी, म.अलीम,अनिस बाबुमिया,सय्यद कलीम, कैलास बलखंडे,अनिल अहिरे,शेख अफसर,विनायक देसाई,माधव मोहिते,संतोष पुरी यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या