🌟परभणी जिल्ह्यातील सेलू येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची दि.१२ डिसेंबर रोजी बैठक....!


🌟या बैठकीत देशातील राजकीय,सामाजिक,आर्थिक परिस्थितीचा आढावा मांडला जाईल🌟

परभणी (दि.०५ डिसेंबर) : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात हुतात्मा बाबू गेणू आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

           बैठकीत देशातील राजकीय,सामाजिक,आर्थिक परिस्थितीचा आढावा मांडला जाईल. शेतकरी संघटनेच्या विचाराचा प्रचार आणि प्रसाराची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण आहे. तसेच कार्यकारिणीत त्यादृष्टीने फेरबदल करण्यात येणार आहेत. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष दत्ता कदम, उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अ‍ॅड. पांडुरंग रायते, मराठवाडा विभाग प्रमुख बंडू सोळंके, विदर्भ विभाग प्रमुख डॉ. गोविंद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शेतकरी संघटना व बळीराजा शेतकरी संघर्ष समिती हे या बैठकीचे आयोजक असणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमृतराव शिंदे, माजी जि.प. सदस्य रमेशराव माने यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या