🌟पुर्णेतील नगर परिषद सभागृहात संविधान गौरव सोहळ्यासाठी दि.१९ डिसेंबर रोजी बैठीकीचे आयोजन.....!


🌟शहरातील सर्व संविधाननिष्ट नागरिक विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देवून बैठकीसाठी निमंत्रण🌟 

पुर्णा : पूर्णा येथे होणाऱ्या बावीसव्या संविधान  गौरव सोहळ्याचे आयोजन करण्याच्या उद्देशाने पुर्णा नगर परिषदेच्या सभागृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन मंगळवार दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास करण्यात आले आहे.

या बैठकीत संविधानाच्या प्रबोधनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व संविधानाचे गाढे अभ्यासक यांना पाचारण करण्याच्या उद्देशाने सविस्तर चर्चा होणार आहे संविधान गौरव सोहळ्याचे हे बावीसवे वर्ष असून आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, विचारवंत, साहित्यिक, नेते,आमदार,खासदार आणि मंत्री यांनी या सोहळ्यात आपली हजेरी लावून संविधानाचे प्रबोधन केले आहे.या वर्षी सुद्धा मोठा कार्यक्रम घेण्याचा मानस गौरव सोहळ्याचे प्रमुख संयोजक प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केला असून शहरातील सर्व संविधाननिष्ट नागरिक आणि विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देवून निमंत्रित केले आहे.

   या बैठकीस प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले,प्रा.अशोक कांबळे,डॉ.प्रकाश मोगले, डॉ .दत्तात्रय वाघमारे,आदि मान्यवर मार्गदर्शन करतील.तेंव्हा निमंत्रित मान्यवरांनी वेळेवर येवून बैठक यशस्वी करावी अशी विनंती रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या