🌟मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांना होणार विलंब....!


🌟कसारा घाटात एक मालगाडी रेल्वे रूळावरून घसरली🌟

परभणी : कसारा घाटात एक मालगाडी रेल्वे रूळावरून घसरल्याने मुंबई ते मनमाड व नांदेड या मार्गावरून धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या तासंनतास विलंबाने धावू लागल्या. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास कसारा घाटात एक मालवाहू रेल्वे गाडी रुळावरून घसरल्यानंतर मुंबईहून,नांदेड कडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली तर मुंबईकडे धावणारी नंदिग्राम ,देवगिरी व राज्यराणी एक्सप्रेस मनमाड पर्यंतच धावली तसेच अन्य रेल्वे गाड्या सुद्धा तासंनतास विलंबाने धावत होत्या. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी कोलमडलेल्या या रेल्वेचे वेळापत्रक बद्दल सोमवारी सकाळी उशिरापर्यंत कोणताही खुलासा केला नाही.दरम्यान या घटनेने हजारो रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या