🌟जागतिक कौशल्य स्पर्धेत भाग घेण्याचे अवाहन......!


🌟असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी परभणी यांनी केले🌟

परभणी (दि.14 डिसेंबर) : जागतिक कौशल्य स्पर्धा -2024 साठी राज्य विभाग व जिल्हास्तरीय स्पर्धा दि.29 डिसेंबर ते 10 जानेवारी, 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. 52  क्षेत्राशी संबंधित स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इच्छूक उमेदवारांना दि. 20 डिसेंबर, 2023 पर्यंत www.skillindiadigital.gov.in या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. तरी आय.टी.आय. पास झालेले व आय.टी.आय. शिकत असलेल्या उमेदवारांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी परभणी यांनी केले आहे.


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या