🌟पुर्णेतील अमृतनगरातील श्री.स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती निम्मीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळा....!


🌟मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव व महाआरतीचे आयोजन🌟 


पुर्णा : पुर्णा येथील अमृतनगरातील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री दत्त जयंती निम्मीत दि.२० डिसेंबर २०२३ पासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व पारायण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

यामध्ये विविध याग-हवन,श्री गुरुचरित्र सामूहिक पारायण व विविध प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच मंगळवार दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी श्री दत्त जयंती उत्सव व दुपारी १२-४० वाजता महाआरती सहित श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावेळी पुर्णा शहर व पंचक्रोशीतील भाविक सेवेकरी यांना श्री दत्तजन्म उत्सवासाठी उपस्थित राहन्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी मूळ मराठी संस्कृतीतील विविध प्रकारच्या सण व त्यांचे प्रात्यक्षीके दाखवण्यात येणाऱ आहेत . सप्ताहची सांगता दि. 027/12/2022 बुधवार रोजी सकाळी 10.30 वा. महाआरतीने होणार आहे. यावेळी सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व सेवेकरी व भाविक यांनी नियोजन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या