🌟धनुर्मास-धुंधुरमास आरंभ ते अंत विशेष : धनुसंक्रांतीचा प्रदक्षिणा कालावधी....!


🌟सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो,तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो,त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात🌟

 सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो,तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी म्हणजेच मार्गशीर्ष अमावास्या ही या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो. अशी ही ज्ञानवर्धक व रोचक माहिती श्रीकृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर लेखातून जरूर वाचा... संपादक._

     सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी म्हणजेच मार्गशीर्ष अमावास्या ही या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो. सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धनुर्मास म्हणून ओळखला जातो. यास धुंधुरमास असेही म्हणतात. याला धुंधुरमासा बरोबर झुंझुरमास अथवा शून्यमास असेही म्हणतात. असे म्हणतात की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते.

धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार यावेळी धर्म, तपस्या आणि उपासनेनुसार मनुष्याची परीक्षा होते. धनुसंक्रांतीच्या प्रदक्षिणा कालावधीत, भक्त सनातन धर्माचे पालन करतात आणि भागवताचा अखंड जप करतात आणि त्यांची आध्यात्मिक साधना तसेच उपासना करतात. याद्वारे भक्तांना आदित्यलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते. या मासात लग्नकार्ये, प्रॉपर्टी खरेदी इत्यादी शुभकार्ये करत नाहीत. हा संपूर्ण महिना आपल्या देव देवतांचे प्रती अर्पण असतो.

        हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषतः रात्रीत हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कोंडला जातो आणि मनुष्याची भूक वाढते-

     "बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते प्रबलोऽनल:भवति| 

      दैर्घ्यात् निशानाम् एतऱ्हि, प्रातः एव बुभुक्षित: (भवति)|

       अल्पेन्धनो धातून्स पचेत् ||"

(पवित्र अष्टाङ्ग हृदय सूत्रस्थान: अध्याय ३.)

       याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला, आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो, अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.

हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात प्रातः एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून यथायोग्य विचार. याला आता आपल्या संस्कृतीत कसे बसवले तेही पहाण्यासारखे आहे-

        "तैर्दत्तान् अप्रदाय एभ्यः यो भुङ्क्ते स्तेन एव स:||"

(पवित्र भग्वद् गीता: अध्याय-३: श्लोक क्र.१२वा.)

      अर्थ- इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.


    सर्व अनर्थ टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात प्रातःएव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले. याला आता आपल्‍या संस्कृतीत कसे बसवले तेही पाहाण्यासारखे आहे. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. या काळात पहाटे आणि रात्री शिशिर ऋतूतली बोचरी थंडी असते. दुपारी मात्र हळूहळू ऊन तापायला लागते. धनुर्मासात पहाटे उठून व्यायाम करायचा आणि सकाळी लवकर भरपेट जेवावचे. ते सुद्धा काय तर लोणच्याचा गोळा घातलेली, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांगे, उसावरची पापडी, वरणा-मटार यांची लेकुरवाळी भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्यावर तूप. पचायला तुलनेने हलका, परंतु थंडीने आलेली रूक्षता कमी करणारा स्निग्ध आहार. पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात होतं कसं की, भोगीच्या दिवसापुरता कसा तरी नाक मुरडत आपण हा मेनू जेवणात चालवून घेतो, पण व्यायामाचे काय? छे हो, थंडीमध्ये पहाटे पहाटे उठणार कोण? मस्त पांघरूण गुरफटून झोपायला कसली मज्जा येते!  

         आपल्याला पळणे, आसने करणे अशा व्यायामापेक्षा जिममध्ये वर्कआउट- टाइम पास करायला जास्त आवडते. तिथल्या इन्स्ट्रक्टरने दिलेले डाएट फॉलो करणे महत्त्वाचे वाटते. या फालतू प्रथा कोणी पाळायच्या? शाळा-कॉलेजातल्या मुलांची वजने आणि आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत हे मात्र खरे. भारतातील तरुण वयातल्या मधुमेहींची संख्या वाढली आहे, असे संशोधनाचे आकडे सांगत आहेत, हे काही वेगळे सांगण्याची गरजू भासूच नये!

!! धुंधुरमास निमित्त सर्वांना महिनाभर निरामयतेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

      - संकलन व शब्दांकन -

                       श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                       रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                         फक्त मोबा- ७१३२७९६६८३.


                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या