🌟डिग्रस बंधाऱ्यात जमीनी गेलेल्या फरकंडा येथील शेतकऱ्यांचा जलसंपदा विभागाकडून आर्थिक मानसिक छळ ?


🌟पालम तालुक्यातील फरकंडा येथील अनेक शेतकरी जमीनीच्या मावेजा पासून वंचित : शेतकऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली🌟 

पालम : तालुक्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात फरकंडा शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा मिळाला आहे. परंतु काही शेतकरी मावेजापासून वंचित आहेत.उर्वरित राहिलेल्या फरकंडा शिवारातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा अद्यापही मावेजा मिळाला नाही. दोन ते तीन वर्षापासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. पण अद्याप ही मावेजा मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात जमीन गेल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. प्रशासकीय स्तरावर अनेक वेळा निवेदनाद्वारे मावेजाची मागणी करुनही मावेजा न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झाले. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी अनेक वेळा उपोषण ही करण्यात आले. जलसंपदा विभागाला वेळोवेळी अधिक माहिती पुरवल्या गेली, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग सदरील प्रकरण गांभीर्याने घेत नसल्यामुळे अद्याप ही उर्वरीत शेतकरी मावेजापासून वंचित आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या