🌟परभणी येथील मध्यवस्तीत झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीस दहा वर्ष कारावासाची शिक्षा...!


🌟परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल🌟

परभणी (दि.१६ डिसेंबर) : परभणी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या समद प्लॉटींग कॉर्नरजवळ गळ्यावर चाकूने वार करीत शेख रफीक शेख गणी यांची मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती या घटनेतील आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील यास परभणी जिल्हा न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास तसेच दुसर्‍या गुन्ह्यात ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस कारावास अशी शिक्षा ठोठावली.

             येथील नानलपेठ पोलिस स्थानकात श्रीमती नसरीन बेगम शेख रफीक यांनी २३ जानेवारी २०२२ रोजी एक फिर्याद दाखल केली. त्यातून त्यांची बहीण शाहीण बेगम यांनी मोबाईलवरुन फिर्यादीची मुलगी शरीन बेगम हिला तिचा दिर शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील याने तिला पोटावर लाथ मारल्याने तिच्या पोटात दुखत आहे व ती सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे, असे कळविले. हा निरोप आल्याबरोबर फिर्यादी व तिचा पती शेख रफीक शेख गणी व मुलगा शेख यासीन हे दुचाकीवर मुलीचे रिपोर्ट घेवुन सरकारी दवाखान्याकडे निघाले. तेव्हा आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील हा समद प्लॉटींगच्या कॉर्नरजवळ उभा होता. त्याने त्यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने फिर्यादी, तिचा पती व मुलगा हे खाली पडले. त्यानंतर आरोपी शेख मेहराज याने ‘मैं तुमको जिंदा नही छोडुंगा तुझे खतम करता’ असे म्हणुन फिर्यादीचे पती शेख रफिक शेख गणी यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यामध्ये शेख रफीक जखमी झाले. त्यांना उपचारकामी सरकारी दवाखाना व खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. परंतु अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यु झाला.

              दरम्यान, नसरीन बेगम शेख रफीक यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यात कलम ३०७,३४१ भादवि नुसार संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला उपचारादरम्यान जखमी मयत झाल्यामुळे या गुन्हयात भादंवि कलम ३०२ नुसार वाढ झाली. गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे यांनी केला. न्यायालयात या प्रकरणात खटला उभा करण्यात आला. त्यावेळी  हा खटला दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.ए.ए.ए. शेख यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी एकुण ०६ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीतून शेख रफीक यांचा मृत्यू केवळ हा मनुष्यवध असून जप्त केलेल्या शस्त्रामुळेच झाला असे निष्पन्न झाले. आरोपीचे जप्त केलेले कपडे व आरोपीकडुन जप्त केलेले शस्त्र (चाकु) यावर मयत शेख रफीक यांच्या रक्ताचा अंश आढळुन आला. आरोपीने त्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी न्यायालयासमोर आरोपी शे.मेराज याने चाकुने गळ्यावर वार करुन खुन केला, असे सांगितले.

              पोलिस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा व  अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी अंमलदार पोह डी. के. खुणे यांनी काम पाहिले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या