🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण मानव जातीला दिशादर्शक....!


🌟सुप्रसिद्ध लेखक नारायणराव जाधव यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी दुपारी दोन वाजता भदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध कवी यशोधरा महानाट्याचे लेखक नारायणराव जाधव व भारतीय संविधानाचे अभ्यासक सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. एम. एम .सुरनर हे होते सकाळच्या सत्रात सकाळी 9.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यातआले.यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या हस्ते निळा ध्वज अर्ध्यावर उतरून मानवंदना दिली.पूज्य भदंत पयावांश यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.



बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी दुपारी बारा वाजता महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प पुष्पहार अर्पण करून वंदना पूजा पाठ घेण्यात आला.बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणाहून महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सजविलेल्या रथामधून अभिवादन रॅली" डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे"या घोष वाक्या मध्ये रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अभिवादन सभेमध्ये झाला.सुप्रसिद्ध कवी लेखक नारायणराव जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या च्या जीवनातील विविध प्रसंग" भिमाई" या गेय काव्य प्रयोगातून अभिनयातून सादर करून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.

यावेळी ते पुढे म्हणाले या देशातील शोषित पीडित वंचित कष्टकरी शेतकरी कामगार दलित पद दलीत व स्त्री वर्गांना त्यांचे न्याय नैसर्गिक हक्क मिळवून दिले. संपूर्ण हयात त्यांनी या कामी खर्च केली अखिल मानव जातीचे कल्याण त्यांच्या विचारात व कार्यात आहे . महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानव मुक्तीचे विचार संपूर्ण जगाला दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले.सुप्रसिध्द व्याख्याते प्रा.एम.एम.सुरनर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक धार्मिक विचारावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.भारतीय राज्यघटना प्रमुख शिल्पकार या नात्याने समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व  न्याय ही सर्वोत्तम मानवी मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश केला.त्यामुळेच भारतीय राज्यघटना जगामधील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून गणली जाते.जगाला युद्ध नको आहे.महामानव तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाला हवे आहेत.असे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप मध्ये उत्तम खंदारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे महा पुरुष होते. त्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची तरतूद करण्याचं प्रावधान त्यांनी केले होते तत्कालीन मराठा नेतृत्वाने "आम्ही उच्च वर्णीय आहोत.आम्हाला आरक्षणाची गरज नाही" असे सांगितले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर आज आंदोलनाची वेळ त्यांच्यावर आली नसती पूज्य भदंत पयावंश यांनी आपल्या संबोधनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याग सेवा समर्पण डोळ्या समोर ठेऊन त्यांचे विचार शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प करावा हीच खरी त्यांना आदरांजली आहे.अभिवादन सभेला जेस्ट विचारवंत प्रकाश कांबळे नगर सेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्म दिप जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड प्रा. अशोक कांबळे कॉम्रेड अशोक व्ही कांबळे दिलीप गायकवाड पी.जी.रणवीर साहेबराव सोनवणे अमृत मोरे टी झेड कांबळे बळीराम खरे पत्रकार विजय बगाटे मुकुंद पाटील  आदींची उपस्थिती होती अभिवादन गीत प्रबोधनकार शाहीर विजय सातोरे  यांनी सादर केले.

सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले बौद्धाचार्य उमेश बारहाटे,त्रबक कांबळे किशोर ढाकरगे,सूरज जोंधळे बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा  व धम्म सेवे मध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या