🌟३१ व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे बामणी खडकी येथे थाटात उद्घाटन.....!


🌟सर्वसामान्यांना बळ देणारे साहित्य साहित्यिकांनी निर्माण करावे - डाॅ.चंद्रकांत लेनगुरे

🌟१३ पुस्तकांचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन : पुस्तक पोयात थोर पुरूषांच्या आकर्षक वेषातील बालके🌟

३० वर्षापुर्वी लावलेल्या झाडी बोली चळवळीच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या चळवळीने झाडीपट्टीत १५००च्या वर साहित्यिक निर्माण केलेले आहेत. हे या चळवळीचे मोठे यश असून आता सर्वसामान्यांना जगण्यासाठी बळ देणारे साहित्य साहित्यिकांनी निर्माण करावे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी झाडी बोली साहित्य मंडळ साकोली व झाडी बोली शाखा बाम्हणी/खडकी ता.सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ३१व्या झाडीबोली साहित्य  संमेलनात केले. ते बामणी येथील नाटककार भवभूती साहित्य नगरीत उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलले. या संमेलनाचे उद्घाटन सडक अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी झाडी बोली हा उत्तम असा ठेवा असून साहित्य संमेलने बोली व संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे कार्य करतात. झाडीबोलीतून हा देश एकसंघ ठेवणारे साहित्य निर्माण व्हावे, असे प्रतिपादन केले.

  याप्रसंगी प्रमुख अतिथी केंद्रिय संस्थापक अध्यक्ष डॉ.हरिश्चंद्र बोरकर, पुर्व संमेलनाध्यक्ष कवयित्री रंजनाताई हलमारे, पुर्व स्वागताध्यक्ष अमोल हलमारे, ज्येष्ठ साहित्यिक राजन जयस्वाल, ज्येष्ठ साहित्यिक अॉड.लखनसिंह कटरे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते,संत साहित्याचे अभ्यासक डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे, ज्येष्ठ साहित्यिक हिरामन लांजे, कवयित्री अंजना खुणे, संतकवी डोमा कापगते, इतिहास तज्ञ डॉ.मनोहर नरांजे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ साहित्यिक ना.गो थुटे, नरेश देशमुख, गडचिरोली झाडीबोली सा.मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.विनायक धानोरकर, अ.भा.सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, पवन पाथोडे, कुंजीराम गोधोडे, अरूण झगडकर, शशिकला गावतुरे, रत्नमाला भोयर, स्वागताध्यक्ष विलास वट्टी, पंडीत लोंढे, सुभाष नकाते, विजया ब्राह्मणकर लक्ष्मण खोब्रागडे, सुखदेव चौथाले, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांना वेदप्रतिष्ठान नागपूर संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळी लक्षवेवधी ग्रंथदिंडी गावातून काढण्यात आली. उद्घाटनावेळी ३०व्या झाडीबोली संमेलनाच्या अध्यक्षा रंजना हलमारे यांनी डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांचेकडे संमेलनाध्यक्षाचे सुत्र ताम्रपट देऊन सोपवले. झाडी बोली गौरव गीत शाहीर नंदूभाऊ मसराम व संच यांनी  सादर केला. ते  संमेलनाचे आकर्षण ठरले. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीच्या विस्ताराबाबत आनंद व्यक्त केला. स्वागताध्यक्ष विलास वट्टी यांनी साहित्य संमेलनाचे प्रयोजन व त्या भागातील इतिहास मांडला. या प्रसंगी १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.संचालन संजय निंबेकार यांनी केले तर आभार पवन पाथोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कवी मुरलीधर खोटेले, उपसरपंच विकास खोटेले, विलास शिवनकर, नरेश भेंडारकर, प्रदीप मेश्राम, योगेश्वर गजभिये, किशोर तोरणे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. ही माहिती आमच्या न्युजनेटवर्कला श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या