🌟जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक मोबाईल व्हॅन अशा एकुण 9 तालुक्यामध्ये 9 मोबाईल व्हॅनव्दारे जनजागृती🌟
परभणी (दि.१९ डिसेंबर) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण तसेच मतदारांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मतदान केंद्रनिहाय आराखडा तयार करून सुसज्ज 9 मोबाईल व्हॅनव्दारे तसेच अभिरूप मतदान केंद्र स्थापन करून त्याव्दारे जनजागृती मोहिम डिसेंबर ते फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक मोबाईल व्हॅन अशा एकुण 9 तालुक्यामध्ये 9 मोबाईल व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सुचनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिरूप मतदान केंद्राचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. या अभिरूप मतदान केंद्रात निवडणूक विषयक व्हीडीओ, ऑडिओ, रिल्स त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदार कार्यालयात येणारे अभ्यागत तसेच कर्मचारी यांना मतदान करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित 2 मास्टर ट्रेनर व त्यांचेसोबत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आली आहे. मतदार स्वतः मतदान करून त्यांच्या शंका तसेच येणाऱ्या समस्याचे समाधान संबंधित प्रशिक्षित मास्टर ट्रेनरमार्फत करून घेता येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानांची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. या वेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कवली मेघना यांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले. जिल्हाधिकारी यांनी 18-19 या वयोगटातील नव मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आगामी काळातील निवडणूकीमध्ये आपण मतदानांचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृती गायकवाड, प्र. उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) जिवराज डापकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, शैलेश लाहोटी तसेच तहसिलदार, निवडणूक नायब तहसिलदार, सतीश रेड्डी, अव्वल कारकून दत्ता गिणगिणे, महसूल सहाय्यक आबासाहेब लोंखडे, प्रदीप जोगदंड, तांत्रिक सहाय्यक दिवाकर जगताप, गोविंद बकान, श्री.जोंधळे, श्री.जोगदंड आदी उपस्थित होते.....
*****
0 टिप्पण्या