🌟परभणी कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.....!


🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील मौ.मसला येथे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न🌟

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडयातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत दि. 05 डिसेंबर 2023 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मसला ता. गंगाखेड जि. परभणी येथे दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन वैजनाथराव शिंदे (सरपंच), तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन शिवाजीराव शिंदे (चेअरमन), शेतकरी संघटनेचे नेते बबनराव शिंदे, डॉ. आर. एम. पाटील (रीलेशनशिप मॅनॅजर एस.बी.आय), श्री. आर. पावडे (क्षेत्र अधिकरी एस.बी.आय) हे उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अमित तुपे, शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी केली. त्यांनी या प्रकल्पाचा उद्देश व दादा लाड लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदेशीर होईल या बाबत विस्तृत माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढील हंगामामध्ये दादा लाड तंत्रज्ञान लागवड पध्दतीने कापूस लागवड करण्या बाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. 

श्री. सी. आर. देशमुख यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा, पिकास आवश्यक असणाऱ्या मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज व कार्य आणि जमीन आरोग्य पत्रिका कशाप्रकारे वाचावी याची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी किमान तीन वर्षातुन एकदा तरी मातीची तपासणी करुनच पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे असे आवाहन केले. तसेच नैसर्गीक शेतीचे महत्व व नैसर्गीक शेतीद्वारे मातीचे संगोपन कसे करावे याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. उषा सातपुते, व आभार प्रदर्शन श्री. कुंडलीक खुपसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी व विषेश कापुस प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मौजे मसला, सावंगी (खु) आणि पिंपरी येथील १२० शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होते.  


वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख 

कृषि विज्ञान केंद्र, परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या