🌟परभणीत आयोजित भव्य हनुमंत कथा व दिव्य दरबार कार्यक्रमा निमित्त परभणी-पाथरी मार्गावर वाहतूक मार्गात बदल....!


🌟वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले🌟 

परभणी (दि.09 डिसेंबर) :   जिल्ह्यात परभणी-पाथरी या राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मीनगरी परिसरात दि. 10 डिसेंबर ते 13 डिसेंबर, 2023 या कालावधीत श्री धीरेंद्र बागेश्वरधाम यांचा भव्य हनुमंत कथा व दिव्य दरबार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अंदाजे एक ते दोन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. 

परभणी- पाथरी हा राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या रस्त्यावरील वाहतूक नियोजित कार्यक्रमा दरम्यान चालू राहिल्यास वाहतूक खोळंबण्याची व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यअता नाकारता येत नाही. त्यामूळे परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दि.11 दि. 11 डिसेंबर, 2023 ते दि. 13 डिसेंबर, 2023 या कालावधीत वळविणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी, परभणी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारचा वापर करुन नियोजित कार्यक्रम कालावधीत गर्दी टाळण्यासाठी  परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावरील (नियोजीत कार्यक्रमास येणारी वाहने व दुचाकी वगळून)  इतर वाहने सेलू कडून मानवतरोड मार्गे येणारी सर्व वाहने कोल्हापाटी (मानवतरोड) येथून मानवत- पोखर्णी फाटा, पाथरी- उमरी मार्गे परभणीकडे, पाथरी कडून मानवत मार्ग परभणीकडे येणारी सर्व वाहने पोखर्णी फाटा, पाथरी-उमरी मार्ग परभणीकडे. तसेच गंगाखेड रोड- वसमत रोड- जिंतूर रोड वरुन येणारी वाहने पेडगाव मार्गे न जाता ती गंगाखेड रोड वरील उमरी फाटा येथून पाथरी कडे वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी,असे आदेश दिले आहेत. 

वरील दिवशी वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या