🌟एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना दृढ संकल्प करा.....!


🌟मानसाला मानूस समजून मानुसकीचा धर्म जोपासण्याचा प्रयत्न करा🌟


मार्ग चुकलेल्या तरुणांना निस्वार्थ मार्गदर्शक बनून मार्गावर आणत त्यांना अपराधी बनण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करा.....लक्षात ठेवा तुम्हाला देखील इश्वराने लेकर दिलेली आहेत त्यामुळे स्वतःच्या संधीसाधू राजकीय स्वार्थापोटी किंवा क्षणीक लालसेपोटी आपल्या पद/प्रतिष्ठा आणि गैरमार्गाने कमावलेल्या अंक्रीत धनाचा वापर करीत कोणाच्याही निरपराध लेकरांना जाणीवपूर्वक अपराधी बनवून त्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करु नका....अन्नदाता शेतकरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ बनून त्यांना खंबीरपणे आधार देण्याचा प्रयत्न करा.....अहंकाराला कायमची मुठमाती देऊन जातपात/धर्म भेदाच्या भिंती पलीकडे जाऊन मानसाला मानूस समजून मानुसकीचा धर्म जोपासण्याचा प्रयत्न करा.....गाव/शहर परिसरातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांचा आपले ग्रामदैवत म्हणून आदर करीत त्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करा.....संत/महंत आणि महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करीत त्यांनी दाखवलेल्या आदर्श मार्गांवर चालण्याचा प्रयत्न करा....एकाच नान्याला जश्या दोन बाजू असतात तश्याच प्रत्येक घटनांना सत्य आणि असत्य या दोन बाजू असतात त्यामुळे दोन्ही बाजूंचा सद्वविवेक बुध्दीने विचार करूनच सत्य किंवा असत्य ठरवण्याचा प्रयत्न करा....गाव/शहर परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याची जवाबदारी जशी प्रशासकीय व्यवस्थेची असते तशीच जवाबदारी एक जवाबदार नागरिक म्हणून प्रत्येक ग्राम/शहरवासीयांची देखील असते त्यामुळे एक जवाबदार नागरिक बनून गाव/शहर परिसरात कायम शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा.....जनसामान्यांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक कर्तव्यदक्ष अधिकारी/कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नयें या दृष्टिकोनातून प्रयत्न करा...

* नवीन वर्षाच्या सर्वांना अगदी मनापासून शतशः हार्दिक शुभेच्छा.....

Happy New Year - 2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या