🌟डॉ.अब्दुल कलामांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जबाबादारी वाढली - गोविंद यादव


🌟समता साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचे मुंबईत थाटात वितरण🌟


गंगाखेड : पुरस्कार फक्त सन्मानच नाही तर जबाबदारीही वाढवत असतात. भारताचे माजी राष्ट्रपती, वैज्ञानीक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला असून भविष्यातली जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया गंगाखेड येथील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तथा पत्रकार गोविंद यादव यांनी व्यक्त केली. आज मुंबईत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


समता साहित्य अकादमीच्या वतीने घोषीत झालेल्या विविध पुरस्कारांचा प्रदान समारंभ  मुंबईतल्या डॉ. शिरोळकर स्मृती मंदिर सभागृहात आज संपन्न झाला.  या प्रसंगी माजी खासदार, ब्रिगेडीयर सुधिर सावंत, जेष्ठ साहित्यिक डॉ. रतनलाल सोनाग्रा, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांचे वंशज तथा महाराष्ट्र शासनाचे उपसचिव डॉ. नंदकुमार राऊत, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, न्या. संदेश शिरसाठ, चित्रपट दिग्दर्शक मनिष वात्सल्य, संस्थाध्यक्ष डॉ. डि.एस. तांडेकर, स्थापत्य अभियंता नागेश पैठणकर, पत्रकार विजय कुलदिपके,गंगाखेड येथील पत्रकार अन्वर शेख लिंबेकर, नागेश नागठाणे, दिपक जाधव, आदिंची ऊपस्थिती होती. 

या कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदव्यांसह देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. यात गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद यादव यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गोविंद यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भविष्यात अधिक सजगपणे सामाजिक उपक्रम राबवत समाजहित साधण्याचा निर्धार यावेळी श्री यादव यांनी बोलून दाखवला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या