🌟पुर्णेतील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अपंग,निराधार महिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरतेय त्रासदायक....!


🌟जिल्हा मध्यवर्ती बँक दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केल्यामुळे अपंग,निराधार महिला,ज्येष्ठ नागरिक त्रस्त🌟


पुर्णा (दि.०७ डिसेंबर) - पुर्णेतील नवा मोंढा परिसरातील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाने बँकेची शाखा दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केल्यामुळे अपंग,निराधार महिला,ज्येष्ठ नागरिक यांना दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत असून होत असून अपंग,निराधार महिला,ज्येष्ठ नागरिक यांना होणारा त्रास लक्षात घेता बँक प्रशासनाने बँक लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसिलदार माधवराव बोथीकर यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रहार तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के पिंपरणकर संजय वाघमारे ,राम सुके, सुरेश वाघमारे, श्रीहारी ईगोले,चद्रकात वंजे, बाबुराव घोडके, तुकाराम शिंदे, एकनाथ जोधळे, मदन वंजे, रावसाहेब शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या