🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील रेपा गावात मराठा आरक्षणासाठी ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या....!


🌟मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात दत्ता पवार या तरुणाने स्वतःच्या हातापायावर पेनने लिहून केली आत्महत्या🌟

परभणी/जिंतूर (दि.१६ डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील रेपा या गावात काल शुक्रवार दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास मराठा समाजातील दत्ता पवार या ३२ वर्षीय बेरोजगार तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात स्वतःच्या हातापायावर पेनने लिहून आत्महत्या केली.

जिंतूर तालुक्यातील रेपा या गावात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावातील विवाहित तरुण दत्ता शिवाजी पवार वय ३२ वर्ष हा तरूण परिसरात विषारी औषध खाल्याने अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. यावेळी  गावकऱ्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. यावेळी मृतकाच्या पायावर (एक अस्सल पाटील मराठा आरक्षण २४ डिसेंबर तर दोन्ही हातावर 'मिशन मराठा २०२४ आरक्षण २०२३ काय करता ५० मराठा' असा मजकूर लिहिलेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मराठा आरक्षण समन्वयक समितीचे बालाजी शिंदे सोसकर,माजी सैनिक बालाजी शिंदे,बाळासाहेब काजळे,अँड. माधव दाभाडे,प्रभाकर लिखे आदींनी धाव घेऊन रुग्णालयात नातेवाईकांचे सांत्वन केले.  यावेळी जिंतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक तिडके,बोरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती सरला गाडेकर,परभणी गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत प्राथमिक पंचनामा केला. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई-वडील असा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या