🌟पुर्णा शहरातील आकाश कदम निर्घृण हत्या प्रकरणात पाच संशयित आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात....!


🌟पोलिस प्रशासनाने ४८ तासात फिरवली यशस्वी तपआसचक्र : पुर्वीचा जुना वाद ठरणा हत्येला कारणीभूत🌟


परभणी/पुर्णा (दि.१० डिसेंबर) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाच्या मैदानावर दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी २२ वर्षीय तरुण आकाश गणेश कदम भरदुपारच्या सुमारास घातक शस्त्रांसह अग्नीशस्त्र वापर करीत अत्यंत निर्दयीपणे निर्घृन हत्या केल्याची घटना घडली होती या होत्या प्रकरणात यशस्वी तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व पूर्णा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत ४८ तासात पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

  परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष  जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर व सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पुर्णा शहरात भरदुपारी घडलेल्या या भयंकर हत्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती पाठोपाठ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी या गुन्ह्याच्या तपासाकरीता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व पूर्णा पोलिसांची वेगवेगळी पथके स्थापन केली. या पथकांनी वेगवेगळ्या दिशेने केलेल्या तपासातून व तांत्रीकदृष्ट्या माहितीतून या प्रकरणातून पाच आरोपी निष्पन्न झाले व जून्या भांडणाच्या कारणावरुनच ही हत्या झाल्याची बाबही निदर्शनास आली. अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, प्रदीप काकडे, दर्शन शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पि.डी. भारती, पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, राहुल परसोडे, दुधाटे, दिलावर पठाण, सिध्देश्‍वर चोटे, विष्णू चव्हाण, परसराम गायकवाड, नामदेव डुबे, शेख रफियोद्दीन, निलेश परसोडे, मधूकर ढवळे, ढगे, घुगे, केंद्र, पोलिस अंमलदार शाम काळे, साहेब मानेबोईनवाड, महेश जुक्टे, पांडुरंग वाघ, बालाजी रेड्डी,गणेश कौटकर आदींनी आरोपींच्या शोधार्थ ठिकठिकाणी छापे मारले व पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले यात दोघा विधी संघर्ष बालकांचा समावेश असून पोलिसांनी ही कारवाई अवघ्या ४८ तासाच्या आत पूर्ण केली..…..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या