🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा परभणीत निषेध....!


🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करीत करण्यात आला उपमुख्यमंत्री पवार यांचा निषेध🌟 


परभणी (दि.13 डिसेंबर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी.च्या विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा संशोधक विद्यार्थ्यानी बुधवार 13 डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध व्यक्त केला.

              सतेज पाटील यांनी सारथी अंतर्गत पीएचडी संशोकांना फेलोशिप द्यावी असा प्रश्‍न अधिवेशनात उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी प्रश्‍नोत्तराच्या तासात पीएच.डी. करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत? असे वक्तव्य केले होते. त्यानंतर परभणीत बुधवारी पीएच.डी. धारक विद्यार्थी आक्रमक झाले. बुधवारी (दि.13) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यानी  हातात फलक घेत ‘तुम्ही उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावलेत’ असा प्रतिप्रश्‍न  केला. तसेच  सर्व पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या