🌟परभणीत "चतुरंग" ची यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी आयोजन....!


🌟चतुरंग प्रतिष्ठाणने याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्यकरणाऱ्यांना या व्याख्यान मालेसाठी निमंत्रीत केले आहे🌟


परभणी : चतुरंग प्रतिष्ठाण आयोजीत यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन दि. 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आलेले आहे कला, साहित्य व सामाजीक बांधीलकीची जान असलेल्या परभणी शहरा मध्ये गेल्या १८ वर्षा पासून चतुरंग प्रतिष्ठानने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात समाजभीमुख कार्य करणाऱ्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी परभणीकरांना उपलब्ध करुन दिली आहे. चतुरंग प्रतिष्ठाणने याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्यकरणाऱ्या व्यक्तींना या व्याख्यान मालेसाठी निमंत्रीत केले आहे.


या व्याख्यानमालेत यापुर्वी डॉ. कुमार सप्तर्षी, सिंधुताई सपकाळ, डॉ. मारोती चित्तमपल्ली, राजु शेट्टी, पोपटराव पवार, प्राचार्य डॉ. अरुण अडसुळ, राही भिडे, शोभा वाघमारे, वडवळ नागनाथच्या सरपंच सौ. मायादेवी सोरटे, डॉ. अविनाश पौळ, प्राचार्य सुनिलकुमार लवटे, प्राचार्य यशवंत पाटने, माजी खासदार यशवंतराव गडाक, मोहीब कादरी, सौ. प्रतिभा शिंदे, विश्वंबर चौधरी, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. लक्ष्मन आसबे, डॉ. स्मिता कोल्हे, मुनोत कुटुंबीय (लासुर स्टेशन), यजुर्वेद्र महाजन,डॉ. विठ्ठल लहाने, मनोज हडवळे, इंजी. सागर रेड्डी, अरविंद जगताप, दिशा शेख, विलास बडे, शरद तांदळे, इंद्रजीत देशमुख व अवीनाश सावजी यांनी आपल्या अमृत वाणीने परभणीकरांना चिंब भिजवले आहे.

यावर्षी या व्याख्यानमालेचे 19 वे वर्ष आहे. यावर्षी या व्याख्यानमालेत दि. 28 डिसेंबर 2023 रोजी श्री. संजय कळमकर हे "जगण्यातील आनंदाच्या वाटा" या विषयावर व दि. 29 डिसेंबर 2023 रोजी श्रीमती. रजीया सुलताना हया "स्त्री समजून घेतांना" या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. परभणी शहरातील नागरीकांनी दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार सयंकाळी 6.00 वाजता व दिनांक 29 डिसेंबर 2023 शुक्रवार सायंकाळी 6.00 वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक सभागृहात उपस्थीत रहावे. असे प्रतिष्ठाणच्या वतीने कळविण्यात येत आहे......





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या