🌟विश्व नागरी उड्डाण दिन दिवस : हवाई प्रवास : मोठाच यादगार.....!


🌟दरवर्षी ७ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन साजरा केला जातो🌟

     हा जगभरातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला आहे. आज ७ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी हवाई प्रवास  हा एक वेगवान आणि आरामदायी मार्ग आहे. मात्र आजही जगभरातील अनेक गरीब देश किंवा विकसनशील देशांतील अनेकांसाठी हवाई प्रवास हे एक स्वप्नच आहे. अर्थात देशातील अनेक छोट्या शहरांना हवाई प्रवासासाठी जोडण्यासाठी उडान योजना राबवण्यात येत आहे. जगभरातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाचे महत्त्व अधोरेखित करत २०१३ पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. अर्थातच जरी ७ डिसेंबर २०१३ आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला असला तरी याचे इतिहासाशी जुने नाते आहे. 


  हवाई प्रवासाच्या क्षेत्रात सुरक्षा आणि सावधगिरी यांना चालना देण्यासाठी या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना किंवा संस्थांमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाचे महत्त्व आहे. जगभरातील मानकांसाठी आयसीएसओ ही हवाई प्रवासातील सुरक्षेसाठीच्या आंतरराष्ट्रीय मानकांसाठी काम करते आणि ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाचाच एक भाग आहे. ७ डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन साजरा केला जाण्यामागे १९४४मध्ये शिकागोमध्ये याच दिवशी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन करारावर सह्या होणे हे आहे. नागरी उड्डाण प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकजिनसीपणा साधण्यासाठी ७ डिसेंबर १९४४ला इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणाचे सामाजिक आणि आर्थिक विकासातील महत्त्व यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन अनेक जागतिक संघटनांसोबत मिळून काम करते. यामध्ये जागतिक मोसम विभाग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, युनिव्हर्सल पोस्टल युनियन, जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ इत्यादींचा समावेश आहे. देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने उड्डान योजना आणली. या योजनेअंतर्गत हवाई सेवा लहान शहरांमध्ये सुरू करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारची ही नवी विमान वाहतूक सुधारणा आहे. योजनेनुसार ५ विमानतळ गुजरातमधील केशोद, झारखंडमधील देवघर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्ग याशिवाय उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बांधले जातील. हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, मंडी आणि बद्दी याशिवाय उत्तराखंडमधील हल्दवानी आणि अल्मोडा येथे हेलिपॅड बांधले जातील.

      आईसीएओच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सन १९९४मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाची सुरूवात करण्यात आली. सन १९९६मध्ये त्याच्या पुढाकारानंतर आणि कॅनडाच्या सरकारच्या मदतीने, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अधिकृतपणे या दिवसाला संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन म्हणून मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिनाचे उद्दिष्ट राज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणाच्या महत्त्वाविषयी जगभरात जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना बळकट करणे तसेच खरोखर जागतिक जलद पारगमनामध्ये योगदान देणे आणि राज्यांना मदत करण्यात आईसीएओची अनोखी भूमिका आहे, याची जाणीव करून देणे हे आहे. युनायटेड नेशन्स आणि जगातील राष्ट्रे आता अजेंडा 2030 स्वीकारत असून, जागतिक शाश्वत विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करत असताना, जागतिक कनेक्टिव्हिटीचे इंजिन म्हणून विमानचालनाचे महत्त्व शिकागो शिखर परिषदेच्या उद्दिष्टांशी कधीही जास्त सुसंगत नव्हते. आंतरराष्ट्रीय उड्डाण म्हणून पाहिले जाते.

        विमान वाहतुकीबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये जी तुम्हाला कदाचित माहीत नसतील. १) जगातील सर्वात जुनी एअरलाइन म्हणजे रॉयल डच एअरलाइन्स आहे. त्याची स्थापना सन १९१९मध्ये झाली आणि त्याचे पहिले उड्डाण १७ मे १९२० रोजी एमस्टरडॅम आणि लंडन दरम्यान झाले. २) भारतातील सर्वात जुनी एअरलाइन टाटा एअरलाइन्स आहे, जी सन १९३२मध्ये जेआरडी.टाटा यांनी स्थापन केली आणि सन १९४६मध्ये एअर इंडिया बनली. ३) पायलट आणि सह-वैमानिक समान अन्न खात नाहीत, कारण जर एखाद्याला अन्नातून विषबाधा झाली तर दुसरा विमान उडवू शकतो. ४) सन १९८७मध्ये अमेरिकन एअरलाइन्सने त्यांच्या प्रथम श्रेणीतील ग्राहकांच्या सॅलडमधून १ ऑलिव्ह काढून $४०,००० वाचवले. ५) सन २०१५मध्ये जगातील नागरी विमान वाहतूक ताफ्यात २७,३५२ विमाने होती. ६) जगातील विमान कंपन्यांनी  सन २०१५मध्ये एकूण ४.१ ट्रिलियन प्रवासी-मैलांसाठी ३.५ अब्ज लोकांची वाहतूक केली. ७) पहिले नियोजित व्यावसायिक विमान उड्डाण १ जानेवारी १९१४ रोजी फ्लोरिडा बे ते सेंट पीटर्सबर्ग ते टँपा येथे झाले. ८) सरासरी फक्त २५ टक्के ग्राहक फर्स्ट क्लाससाठी पूर्ण भाडे देतात, तर बाकीचे दैनंदिन फ्लायर्स, एअरलाइन कर्मचारी किंवा अपग्रेडर असतात. ९) सरासरी, व्यावसायिक उड्डाणाचा वेग ८०० किमी/तास असतो. १०) विमानातील ऑक्सिजन मास्क सुमारे १५ मिनिटे ऑक्सिजन ठेवू शकतात.

         दि.७ डिसेंबर १९४४रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर सन १९९६मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली. हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे, हा या दिवसाचा उद्देश होता. त्यामुळे जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रण- एटीसी साठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती. क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ४४९ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.

        जगातील सर्वात उंच चार एटीसी टॉवर्स आशियात- थायलंड, मलेशिया, जपान, चीन हे असून तीन अमेरिकेत आहेत. रॉयल डच ही सर्वात पहिली एअरलाइन असून १९१९ मध्ये तिची सुरुवात झाली होती. दि.१७ मे १९२० रोजी या एअरलाइनच्या पहिल्या विमानाने एम्स्टर्डमहून लंडनच्या दिशेने प्रयाण केले होते. त्यानंतर क्वांटस (१९२०) एअरलाइन सुरू झाली.  बोइंग ७४७-४०० एसच्या कॉकपिट विंडो फ्रेमचा खर्च एका लक्झरी कारच्या खर्चाएवढा आहे. त्याची वायरिंग २८० किमी लांबीची असते. अलास्का एअरलाइनने सर्वप्रथम १९९९मध्ये ऑनलाइन चेक इन सेवा सुरू केली. विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला वेगवेगळे भोजन दिले जाते. विषबाधा झाल्यास यापैकी एक जण तरी विमान सांभाळू शकेल, हे यामागील कारण. चीनमधील काम्दो-बांग्दा येथील धावपट्टी जगात सर्वात लांब (५.५ किमी) असून ती तिबेट क्षेत्रात येते. त्यानंतर रशिया व फ्रान्सचा क्रमांक लागतो. १ जानेवारी १९१४ रोजी अमेरिकेत पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाचे उड्डाण फ्लोरिडा बेपासून टेंपा येथील सेंट पीटर्सबर्गकडे झाले होते. २०१५मध्ये जगातील सहाव्या सर्वात व्यग्र विमानतळाचा मान लंडनमधील हिथ्रो विमानतळाला मिळाला. त्यापूर्वी टोकियो, शिकागो, दुबई, बीजिंग आणि अटलांटाचा क्रमांक लागला. लंडनहून पॅरिसकडे जाणाऱ्या विमानात १९१९मध्ये सर्वप्रथम नाष्ट्यासाठी रोख घेतली गेली. एअर पोर्ट हा शब्द पूर्वी १७८०मध्ये जहाज व्हेंटिलेशनसाठी तयार केलेल्या जागेसाठी किंवा छिद्रासाठी वापरला जात असे. सन १९०२मध्ये हा शब्द सर्वप्रथम विमानांसंदर्भात वापरला गेला, हे विशेष!

!! जागतिक नागरी हवाई दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

  - संकलन -

                श्री एन.कृष्णकुमार जी. गुरूजी.

               गडचिरोली, फक्त मधुभाष- ७७७५०४१०८६.                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या