🌟परभणी तालुक्यातील तटुजवळा येथे वंधत्व निवारण शिबिर संपन्न.....!


🌟या शिबिराचे उद्घाटन तटुजवळाचे उपसरपंच मदनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले🌟 

परभणी : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत राज्यव्यापी वंधत्व  निवारण अभियान अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक पिंगळी व ग्रामपंचायत तटुजवळा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य पशुवंधत्व निवारण शिबीर मौजे तटुजवळा ता.जि.परभणी येथे दि‌.11डिसेंबर रोजी येथे संपन्न झाले.


या शिबिराचे उद्घाटन तटुजवळाचे उपसरपंच मदनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले . शिबिरामध्ये 11 गाई व 6म्हैशींचे वंधत्व तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी उपस्थित पशुपालकांना गाई म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र ,म्हशीं न मध्ये  मुक्का माज , कृत्रिम रेतन तंत्र, वंधत्व निवारण, वैरण विकास इत्यादी विषयांवर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शाहिद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी  गावचे नागरीक  अरुण कदम,

गोपाल कदम, श्रीराम कदम उद्धव, उद्धव जाधव, ओम कदम, अंकुश वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री प्रकाश शिंदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या