🌟हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना अंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन धमकीचा कॉल....!


🌟भारतात प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी मोठे स्फोट घडवून आणण्याची दिली धमकी🌟


नांदेड/हिंगोली : नांदेडचे पुर्व आमदार तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील यांना अंतरराष्ट्रीय क्रमांक ४४७४१८६०१७५० या क्रमांकावरुन तब्बल दोन वेळेस धमकीचा कॉल आल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला असून या संदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दिली आहे. 


भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२४ रोजी भारतात मोठे स्फोट घडवून आणू अशी धमकी खा.हेमंत पाटील यांना आलेल्या कॉलवरुन देण्यात आल्याने पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून खा.हेमंट पाटील यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे खासदार पाटील यांना दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी अंतरराष्ट्रीय क्रमांक ४४७४१८६०१७५० या क्रमांकावरुन धमकीचे कॉल आले असून खालिस्तानवादी गुरदीपसिंघ पन्नू याच्या नावाने हे कॉल करण्यात आल्याचे समजते. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना १४ डिसेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या कॉलवरुन बोलतांना संबंधित व्यक्तीने आम्ही भारताला आमची ताकद दाखवून दिली आहे १० जानेवारी आणि २६ जानेवारी २०२४ या दोन दिवशी भारतामध्ये स्फोट घडवून आणण्यात येतील स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा अशी धमकी दिल्याचे समजते या धमकी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

अंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आल्याची ही बाब खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, लोकसभा अध्यक्ष,गृहमंत्री अमित शहा,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांनीही आपल्या यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेडस्थीत 'तुकाई' या निवाससस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हा फोन नेमका कोणी आणि कुठून आला याची चौकशी पोलीस करत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या