🌟नांदेड येथे श्री तेगबहादर जी महाराज शिखांचे नववे गुरु यांचा शहीदी गुरुपुरब साजरा...!


🌟या निमित्त श्री सुखमणी साहेब जिचे पाठ व कथेचे आयोजन देखील करण्यात आले होते🌟

नांदेड : धन धन श्री तेगबहादर जी महाराज शिखांचे नववे गुरु यांच्या शहीदी गुरुपुरब दिनांक 17/12/2023 ला श्रद्धा आणि प्रेमाने साजरा करण्यात आला धन श्री गुरु तेगबहादर महाराज यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी देश आणि मानवतेसाठी आपले शीश बलिदान दिले दिल्ली चांदनी चौक येथे आजही  गुरुद्वारा शीश गंज साहेब सुशोभित आहे 

या निमित्त श्री सुखमणी साहेब जिचे पाठ व कथेचे आयोजन हजुरी साधसंगत व गुरु का खालसा संस्थेचे वतीने स्थानिक गुरुद्वारामध्ये करण्यात आले हा कार्यक्रम जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहेब तसेच गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक थान सिंग यांच्या सहकार्याने पार पडला."गुरु का खालचा संस्थेचे "(अध्यक्ष) कश्मीर सिंघ भट्टी वतीने पाच दिवस रोज रात्री तारीख 13 से 17 डिसेंबर 2023 7: 30 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाला ज्ञानी सरबजीत सिंग जी निर्मले आणि ग्यानी मनजीत सिंग जी गुरुद्वारा लंगर साहिब यांनी पाच दिवस कथा केली या निमित लंगर प्रसादाचे ही वाटप करण्यात आले. यावेळी हजुरी साध संगत तसेच कश्मीर सिंघ भट्टी, जसबीर सिंघ चड्डा, राजेंद्र सिंघ सिद्धू, प्रीतम सिंघ हरियाणा, हरभजन सिंघ भट्टी, बलजीत सिंघ, राम सिंघ रामगडीया अनेकजण उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या