🌟आदर्श व संस्कारक्षम शिक्षक दिवंगत कै.रावसाहेब जोगदंड....!


🌟त्यांच्या विचाराला कार्याला पावन स्मुर्तीला विनम्र अभिवादन🌟

जुन्या पिढीतील आदर्श संस्कारक्षम शिक्षक शिस्तप्रिय तत्वनिष्ठ मुख्याध्यापक श्रद्धेय दिवंगत रावसाहेब रुस्तुम राव जोगदंड यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक 27 नोव्हेंबर ला दुःखद निधन झाले.पूर्णा तालुक्यातील गौर ही त्यांची जन्मभूमी वडील रुस्तुम राव वारकरी संप्रदायातील संत आणि महापुरुष समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रभाव असलेले.आई कुटुंब वस्तल परोपकारी कष्टाळू नातेवाईक आप्तेष्ट यांच्या सुखदुःखात अंतकरण पुर्वक सहभागी होणाऱ्या होत्या.त्यांनी त्या काळा मध्ये 1940 _50 च्या दशका मध्ये आपल्या मुला मुलींना शिक्षण व चरित्र नीतिमत्तेच्या धडे दिले.संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वचना प्रमाणे "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" त्यांची सर्वच मुल मुली सन्मार्गावर आरूढ आहेत. 

रावसाहेब हे बालपना पासून कुशाग्र बुद्धीचे हजरजबाबी शिक्षणा मध्ये कमालीची आवड असणारे होते शाळेत प्रवेश घेते वेळीच त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, यांना आपल्या हुषारीची चुणूक दाखवली .त्या वेळीं शिक्षक म्हणाले रुस्तुम राव पाटीलआपला मुलगा रावसाहेब शिकून आपलं नाव खुप मोठ करणार.शिक्षकांची भविष्यवाणी खरी ठरली.शाळेत ते नियनित जाऊ लागले.त्यांना वाचन लेखनाची मनस्वी आवड त्या मधून मोत्या सारखं सुंदर हस्ताक्षर वाचणा मधून वैचारिक प्रगल्भता व्यासंगी पणा वाढीस लागला.संत थोर महापुरुष यांची जीवन चरित्र शालेय जीवनात वाचली.पूज्य साने गुरुजी यांचं जीवन चरित्र वाचलं त्यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक वाचलं .अगदी शालेय जीवनात त्यांनी संकल्प केला आपण शिक्षक च व्हावं. मॅट्रिक पास झाल्या नंतर त्यांनी अध्यापक पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून परभणी जिल्हा परिषदे मध्ये शिक्षक पदावर रुजू झाले.चार दशकं व्रतं स्थ सेवाभावी समर्पित पणे शिक्षकी पेशाला त्यांनी वाहून घेतले होते.परभणी   जिल्ह्यात विविध ठिकानी ग्रामीण भागात त्यांनी नोकरी केली त्यांच्या शिकवणीतून संस्कारातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी घडले. आपण करतं असलेल्या कार्याचा त्यांनी कधीं गवगवा केला नाही प्रसिद्धी पासून दूर राहणं त्यांनी पसंत केलं.

मुख्याध्यापक पदावर त्यांचं प्रमोशन झाले.ऐक शिस्तप्रिय कुशल मुख्याध्यापक म्हणून त्यांनीं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.सेवानिवृत्ती नंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्या साठी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प राबवला मोठा प्रतिसाद या त्यांच्या निरपेक्ष सेवाभावी कार्याला मिळाला.मानवी जीवनाचं रहस्य निष्काम सेवे मध्ये दडलेले आहे." मरावे परी किर्तिरुपी उरावे"ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली.त्यांचे सुपुत्र दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार बहुआयामी व्यक्तिमत्व जगदीश जोगदंड सर यांच्या सेवनिवृत्ती निरोप समारंभाला त्यांची उपस्थिती होती.आपल्या या लाडक्या सुपुत्रावर सर्व जातीधर्माचे लोक किती प्रेम करतात.सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आमदार खासदार कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.या भावपूर्ण सोहळ्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं होते.आपल्या विचारांचा कार्याचा समृद्ध वारसा आपला सुपुत्र पुढे नेत आहे या बद्दल त्यांना धन्यता वाटत होती.या कार्यक्रमात त्यांची अखेरची भेट व दर्शन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्रकार जगदीश जोगदंड सर,व समरसता मंचचे जिल्हा सह समन्वयक अनंत जोगदंड व पाच सुकन्या असा परिवार आहे परभणी या ठिकाणी जिंतूर रोड स्मशान भूमि मध्ये अतिशय शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 सायंकाळी करण्यात आले.

या वेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिनांक 29 डिसेंबर 2023 या दिवशी त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम जागृती मंगल कार्यालय वसमत रोड परभणी या ठिकाणी दुपारी एक ते पाच यादरम्यान आयोजित केला आहे.

त्यांच्या विचाराला कार्याला पावन स्मुर्तीला विनम्र अभिवादन...!

अभिवादक

श्रीकांत हिवाळे सर

तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जी.परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या