🌟राज्यात सेवानिवृत्ती नंतर ही पोलिस अधिकारी असुरक्षित : पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकावर जिवघेणा हल्ला...!


🌟हल्ल्यात पोलीस निरीक्षक वजीर शेख गंभीर जखमी : प्रकृती चिंताजनक🌟 

पुणे : महाराष्ट्र राज्यात सेवानिवृत्ती नंतर देखील पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे जिवन असुरक्षित असल्याचे आता समोर आले असून कर्तव्य बजावत असतांना गुन्हेंगारांशी वेळोवळी होणारा सामना या घटनांना कारणीभूत तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होणारी घटना नुकतीच उघडकीस आली असून पुण्यातील वानवडी परिसरात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी रात्री जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना दगडाने ठेचण्यात आले आहे. हल्ल्यात वजीर शेख गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक शेख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे पोलीस निरीक्षक शेख काही महिन्यांपूर्वीच पोलीस दलातून निवृत्त झाले होते ते सध्या कोंढवा परिसरात राहायला आहेत शुक्रवारी रात्री ०८-३० वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने त्यांना गाठले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेख गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या