🌟आवश्यक शिक्षकांची पुर्तता करा अन्यथा आता वाशिम जिल्हा परिषदेवर पालक अर्धनग्न आंदोलन करणार....!


🌟मंगरुळपीर येथील जागृत पालक कृती विचार मंचचे प्रशासनाला निवेदन🌟

🌟जागृत पालक कृती विचार मंचला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा :  आंदोलनात सहभागी होणार🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुल आणी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.आवश्यक शिक्षकांची पुर्तता करण्यासाठी पालकांनी अनेकवेळा निवेदने केलीत.मंगरूळपीर पंचायत समिती कार्यालयावर अर्धनग्न आंदोलनही केले परंतु तोंडी बोळवनीशिवाय हाती काहीही न लागल्याने आता पालकवर्ग संतप्त झाल्याने तसेच संभाजी ब्रिगेडनेही शिक्षक मागणी प्रकरणी पाठींबा दिल्यामुळे आता वाशिम जिल्हा परिषदेवर आपल्या मागण्यासाठी पालक अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन सबंधित प्रशासनाला दिल्याने वरिष्ठ प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे सर्व शिक्षणप्रेमिंचे लक्ष लागले आहे.

               जि.प.(मा.शा) विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्याल मंगरुळपीर येथे प्रशासनाला दिनांक14-12-2023 रोजी उपरोक्त शाळेमध्ये शिक्षकांची पुर्तता करावी म्हणुन जागृत पालक कृती विचार मंचाच्या वतीने लेखी निवेदन दिले होते व शिक्षणविभागाने या विषयी शिक्षकाची पुर्तता करण्यात येईल म्हणुन तोंडी आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत शिक्षकांची कुठलीच पुर्तता करण्यात आली नाही.सदर शाळेमध्ये 1180 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ज्यामध्ये 37 शिक्षकांची आवश्यता असतांना फक्त 16 शिक्षकच कार्यरत आहेत. विशेषता बोर्डाच्या परिक्ष दोन महिन्यावर येवुन ठेपलेल्या असतांना वर्ग 09 ते 10 या वर्गासाठी गणित विषयाला 3 शिक्षक, विज्ञान विषयाला 2 शिक्षक तर भाषा या विषयाला 2 व सामाजिक शास्त्र 1 शिक्षक मी आहेत. तर वर्ग 06 ते 08 या वर्गाला 6 शिक्षक व वर्ग 5 ला मात्र 4 शिक्षक व ऊपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आहेत परंतु प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. परिणामता

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विशेषत 10 वी. च्या विद्यार्थ्याच्या टक्केवारीवर याचा परिणाम होणार याला आपले प्रशासन जबाबदार आहे असा आरोप पालकांकडुन होत आहे.प्रशासनाने दिनांक 01-01-2024 पर्यंत शिक्षकांची पुर्तता न केल्यास “ जागृत पालक कृती विचार मंच” मंगरुळपीर चे शेकडो पालक,संभाजी ब्रिगेड हे वाशिम जि.प.समोर दिनांक 04-01-2024 रोजी अर्धनग्न आंदोलन करतील असा इशारा पालकांनी लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.

* तोंडी आदेशाने शिक्षक नियुक्त माञ प्रत्यक्षात रुजु नाही :-

मंगरुळपीर येथील जि.प.हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये म्हणून शिक्षक नियुक्त करावे या मागणीसाठी पालकांनी आंदोलन केले होते त्याची दखल म्हणून तिन शिक्षक केवळ तोंडी आदेशाने सबंधीत शाळेत पाठवले पण ते प्रत्यक्षात रुजुच झाले नसल्याचे कळले तसेच आता जि.प.वाशिमला सदर आंदोलन पालक करणार असल्याचे लेखी निवेदन प्रशासनाला धडकताच आणखी सात शिक्षकांची रूजू आदेश आल्याचेही कळले सोबतच चार ते पाच शिक्षक अजुन पाठवणार असल्याचीही माहीती मिळाली परंतु आधीसारखेच तोंडी आदेश देवुन पालकांच्या मागण्याची बोळवण करणार की प्रत्यक्षात मागणीची पुर्तता होणार हे लवकरच कळणार आहे.

* जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक असतांना मंगरुळपीरच्या पालकांना अर्धनग्न होण्याची पाळी का आली ?

वाशिम जिल्ह्यात बरेच शिक्षक अतिरिक्त आहेत तर दुसरीकडे मंगरुळपीर येथील जि.प.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची विद्यार्थी आणी पालकांत ओरड होत आहे.पालक निवेदने आणी आंदोलनेही करित आहे.जर जि.प.कडे अतिरिक्त शिक्षक असतील आणी दुसरीकडे शिक्षकांची पुर्तता करा अशि मागणी होत आहे मग शिक्षणविभाग आणी वरिष्ठ प्रशासन शिक्षक नियुक्तीसाठी मुहुर्त शोधतेय की काय? असा प्रश्न सुज्ञ शिक्षणप्रेमीमध्ये होत आहे.

* शाळा बंद पाडण्याचा घाट ?

एकीकडे जि.प.मध्ये दर्जेदार शिक्षण आणी भौतिक सुविधा ऊपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे.तर दुसरीकडे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे.शिक्षण हमी कायदा लागु असुनही विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित का ठेवले जात आहे हा प्रश्न सुज्ञ लोकांना पडत आहे.मंगरुळपीर येथील जि.प.हायस्कुल आणी कनिष्ठ महाविद्यालयाने हजारो विद्यार्थी घडवले,येथील माजी विद्यार्थी प्रत्येक क्षेञात अव्वल आहेत.असे असतांना आता या शाळेला शिक्षकाअभावी घरघर का लागली?ही शाळाच बंद तर पाडायचा घाट नाही ना?अशी दबक्या आवाजात चर्चाही होत आहे.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या